narmade har har marathi book review cover

नर्मदे हर हर

पोस्ट शेयर करा:

लेखक – जगन्नाथ कुंटे

समीक्षण – आदित्य लोमटे

प्रकाशक – प्राजक्त प्रकाशन

पृष्ठसंख्या – २५६

मूल्यांकन – ४.८ | ५

शतकानुशतके माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत जगन्नाथ कुंटे असेच एक परिक्रमावासी. लेखकाने 1999 ते 2001 दरम्यान एकूण तीन परिक्रमा केल्या त्याचे अनुभव या पुस्तकात प्रकट केले आहेत. देश-विदेशात पत्रकार राहिलेले जगन्नाथ कुंटे हे केवळ धार्मिक अध्यात्मिक ओढीने परिक्रमेला जाणारे भाविक नाहीत तर पूर्व कल्पनांची कुठं मनावर न ठेवता मोकळ्या मनाने येणाऱ्या प्रत्येक अनुभूतीला सामोरे जाणारा शोधयात्री आहे. पत्रकारितेच्या अनुभवाचं सामाजिक भान आणि अध्यात्मिक जाण ही त्यांची शिदोरी. एकेदिवशी लेखकाला साधनेमध्ये आदेश येतो की नर्मदा परिक्रमेला जा आणि त्यानुसार लेखक परिक्रमेला सुरुवात करतो. परी म्हणजे सभोवार, क्रम म्हणजे फिरणे. उजव्या बाजूला दैवाला दैवताला ठेवून फिरणे म्हणजे प्रदक्षिणा, परिक्रमा.

अमरकंटक येथे नर्मदेचा उगम आहे तिथून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपारिक नियम आहे, मात्र नेमावर ग्वारी घाट ओंकारेश्वर नारेश्वर गरुडेश्वर किंवा इतरही ठिकाणाहून परिक्रमेला सुरुवात करतात.

परिक्रमा सुरू करण्यापूर्वी जिथून चालू करायची तिथून प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र द्यावे लागते त्याच्यावर निरनिराळ्या गावी शिक्का मारून घ्यायचा असतो. डाळ किंवा भात शिजवण्यासाठी एखादे छोटे पातेले घ्यावे एखादी छोटी थाळी, चहासाठी किंवा ताकासाठी स्टीलचा एक प्याला घ्यावा अन चालूं पडावे.

परिक्रमेतील अनेक गमती लेखकाने त्याच्या विशिष्ट शैलीत सांगितल्या आहेत. मीठ या खारट पदार्थाला रामरस म्हणतात चावलराम, सब्जीराम, चपातीराम अशी जेवणातल्या पदार्थाला राम लावण्याची पद्धत. लेखकाला परिक्रमा करताना अनेक वल्ली भेटल्या त्यातील कुंटल चॅटर्जी असाच एक वल्ली. त्याच्याबरोबर चा लेखकाचा प्रवास  वाचताना आपणही नकळत त्यांच्यात सामील होऊन मैया किनारी पोहोचतो.

परिक्रमेत असताना येणाऱ्या अनुभवाबद्दल लेखक मनमोकळेपणाने लिहितो. शूलपाणीश्वराच्या जंगलातील लुटण्याचा प्रसंगही केलेल्या तीन परिक्रमा, त्यातील विलक्षण अनुभव, चमत्कार हे सर्व खरे का खोटे ? याची चर्चा करायला जो तो स्वतंत्र आहे. या सर्वात अडकून न राहता आलेले अनुभव एकसुरी न वाटता बहुआयामी वाटतात. चमत्कारही वाटावे असे अनुभव सहजतेने सांगतात. मोकळ्या मनाने खऱ्या अनुभूती ला सामोरे जाणारे जगन्नाथ कुंटे हे एक खरे शोधयात्री वाटतात.

परिक्रमेत अनेक गावातील अनुभवांमुळे माणसांच्या स्वभावामुळे लेखक भारावून तर जातातच पण त्याचबरोबर साधुत्व च्या नावाखाली चाललेल्या बुवाबाजीवर पण कोरडे ओढतात त्याचबरोबर मेधा पाटकरांच्या कामाबद्दल तळमळीने ही लिहितात.

शेवटी ‘नर्मदे हर हर’ हे एक नर्मदा परिक्रमा वरील एका झपाटलेल्या प्रवासाचे कथन आपले वेगळेपणा घेऊन येते अन् वाचता-वाचता आपल्याला नकळत नर्मदा किनारी घेऊन जाते.

समीक्षण – आदित्य लोमटे

narmde har aditya lomte jagannath kunte prajakt


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:




संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *