savarkar ek abhinav darshan marathi book review cover

सावरकर – एक अभिनव दर्शन

पोस्ट शेयर करा:

संपादक – डॉ अभिराम दीक्षित

समीक्षण – अभिषेक पत्की

प्रकाशक – अभिनव निर्माण प्रतिष्ठान

28 मे 1883 हा भारताच्या इतिहासातील एक सोनेरी दिवस, 28 मे 1883 ला एका चित्पावन ब्राम्हण कुटुंबात तात्याराव सावरकर यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव हे भागर. तात्यारावांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव दामोदरपंत, ज्या माय माऊलीच्या  पोटी अश्या प्रखर हिंदुत्ववादी क्रांतिकारकाचा  जन्म झाला त्या मावलीला सुद्धा साष्टांग प्रणाम. 

लहानपणी पासूनचं लिखाणाची, कविता करण्याची भाषणे देण्याची आवड तात्यारावांना होती. जसजसे तात्याराव मोठे होऊ लागले तस तशी राष्ट्र्भगक्ती त्यांच्या अंतरंगात एका पाण्याच्या पातळी प्रमाणे वाढत चालली होती. वेगवेगळ्या आंदोलनांमधून इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवायला सावरकरांनी सुरु केले. सावरकरांचा हिंदुत्वराष्ट्रवाद म्हणजे, सावरकर बोलतांना बोलतात की वाघापुढे मोदक घेऊन जाणाऱ्या पंडिताचे काय होते? वाघाचा मोदक पंडित बनतो, वाघापुढे मोदक घेऊन जाणे म्हणजे सद्गुण नव्हे ती विकृती आहे. आज राष्ट्रवाद जपणे आवश्यक आहे. हिंदूंवर आक्रमण होत असल्याने त्यांनी एक होणे, एकराष्ट्र घेणे आवश्यक आहे. हाच सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद आहे. सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हे मानवते कडे टाकलेले एक पाऊल आहे. 

नंतर सावरकरांवर जे आरोप होतांना दिसतात की सावरकरांनी माफी मागितली माफी मागितली तर वाचनातून एक लक्षात येतं की सावरकरांनी मुळात स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच माफी मागितली नाही, जर भारतमातेचे कार्य अखंड तत्पर सुरु ठेवायचे असेल तर हा गनिमीकावा करणे गरजेचे होते. यावरून सावरकरांच्या कुशल युक्तीचा परिचय होतो. जय देव जय देव जय जय शिवराया ही आरती सुद्धा सावरकरांनी लिहिली, या आरतीचे सामूहिक पठण  करून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य सुद्धा सावरकरांनी मोठ्या प्रमाणात केले. सावरकरांचे दलित कार्य पाहायचे झाले तर सावरकरांनी सवर्ण दलित हा भेद दूर व्हावा यासाठी दलितांना कैक मंदिरे खुली करून दिली. कुठल्याही कार्यक्रमात जर मला तुम्ही बोलवत असाल तर मंचावरचा प्रमुख पाहुणा एक दलित असायला हवा अशी सावरकरांची नेहमीच भूमिका राहिली आहे. सवर्ण दलित हा भेद कायमचा दूर होणे गरजेचे आहे म्हणून सावरकरांनी सामूहिक  पंगतीचे आयोजन केले. यावरून सावरकरांच्या दलित कार्याचा आपल्याला इथे परिचय होतो. जर का भारताला अखंड ठेवायचे असेल तर जातीभेद मुळापासून उखडून फेकावा लागेल असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. 

सावरकरांची नेहमी भूमिका ही देशहिताची राहिली आहे, आपला देश कायमचा गुलामीतून मुक्त व्हावा यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान या देशासाठी फार मोलाचे ठरलेले या सावरकर एक अभिनव दर्शन या पुस्तकामार्फत आढळून येतं. ज्या वेळी सावरकरांना काळ्या  पाण्याची शिक्षा झाली त्यावेळी दुःखी पत्नीला ते समजावून सांगत होते की चार काटक्या जमवून चूल पेटवणे आणि घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार कावळे आणि चिमण्या सुद्धा करतात. त्या संसाराचा मोह होऊ लागला तर एक गोष्ट लक्षात ठेव आज आपल्या संसाराचा धूर झाला तरचं उद्या भारताच्या प्रत्येक घराघरातून सोन्याचा धूर निघेल. यावरून सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा आणि सकारात्मकतेचा परिचय येतो. 

सावरकर महाकवी होते, पण अंदमानात त्यांनी खिळ्याने भिंतीवर कविता लिहिल्या. ते एक श्रेष्ठ लेखक होते, पण त्यांच्या अनेक पुस्तकांवर इंग्रजांनी बंदी घातली. सावरकर एक द्रष्टे समाजसुधारक होते. पण त्यांच्या अनुयायांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी हिंदू हिताचा विचार मांडला पण हिंदू समाज जागा झाला नाही. प्रतिकूल तेच घडेल हा सावरकरांचा जीवनमंत्र होता, पण त्यावर मात करेन ही जिद्द होती. 

शेवटी अखेरचा निरोप घेतांना सावरकर म्हणतात 

आत्मत्याग हा नियम डोळ्यात तेल घालून आपल्या राष्ट्रमातेच्या प्रगतीवर जागरूक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

कारण कार्यनिष्पत्ती हा योगायोग आहे, परंतु आत्मत्याग हा नियम आहे. 

आत्मत्यागाच्या खंबीर पायावरचं अभिनव नी अतिभव्य राज्यांची विभवमंदिरे उभी राहतात. हुतात्म्यांच्या रक्षेत रुजलेले राज्यवृक्ष विस्तीर्ण वाढतात. 

या सर्व वरील बाबींवरून सावरकर कोण होते? काय होते?  याचा आपल्या प्रत्येकाला परिचय येतोच. हे पुस्तक वाचत असतांना अंगावर शहारे आल्यावाचून आणि मनात राष्ट्रभक्ती निर्माण झाल्या वाचून राहत नाही. सावरकर म्हणजे खरंच एक आगीचा गोळा, सावरकर म्हणजे खरंच राष्ट्रप्रेम, सावरकर म्हणजे समर्पण, सावरकर म्हणजे एक ज्वलंत व्यक्तिमत्व या सर्व गोष्टीचा परिचय हे पुस्तक वाचतांना येतो. म्हणून आज प्रत्येक तरुण तरुणीने हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. राष्ट्रभक्ती काय?  कशी?  समर्पण, त्याग या सर्व गोष्टी पुस्तक वाचतांना कधी आपल्या मनात खोल वर परिणाम करत जातात कळतचं नाही.

समीक्षण – अभिषेक पत्की

savarkar ek abhinav darshan abhiram dixit abhishek patki nirman


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:




पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *