लेखक – दु. आ. तिवारी
पृष्ठसंख्या – २०४
समीक्षण – सोहन पाटील
प्रकाशन – गंधाली प्रकाशन
मुल्यांकन – ४ | ५
मराठ्यांची संग्रामगिते हा काव्यखंड मराठ्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य युद्धातील प्रसंगांवर आधारीत आहे, लेखकाने हेच प्रसंग काव्य स्वरुपात या ग्रंथात मांडले आहेत. मी या ग्रंथातील “लववेना हे शिर माते” हे काव्य धारातिर्थ गडकोट मोहीमेत ऐकले आणी ते माझ्या अंतःकरणात भिनले, मग मी या ग्रंथाची शोधमोहीम सुरू केली, बर्याच काळानंतर हा ग्रंथ मिळाला.
कवी “दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी” हे मुळचे उत्तर प्रदेशातील रायबरेली गावचे, त्यांचे आजोबा ब्रिटीश सैन्यात हवालदार होते आणी कार्यप्रदेश महाराष्ट्रातील जळगाव हा असल्यामुळे ते जळगाव मधील शेंदुर्णी गावी स्थायीक होते, तिवारींना मराठ्यांच्या इतिहासच वेड, ऐतिहासिक स्थळांचं वेड खुप होतं, यातूनच त्यांना काव्य रचनेची आवड निर्माण झाली, आणी मराठ्यांची संग्रामगिते, झाशीची संग्राम देवता, राजपूत विरांगना असे अठरा ग्रंथ त्यांनी लीहले.
मराठ्यांची संग्रामगिते या ग्रंथाचा कालखंड हा शिवकाळापासुन ते ब्रिटीशोत्तर काळापर्यंतचा आहे, या ग्रंथात कवीने जो काव्यप्रकार मांडला आहे तो अतिशय उत्कृष्ठ आहे आणी विशेष म्हणजे प्रसंगमांडनी खूपच विलक्षण आहे. लेखकाने या ग्रंथात बरेच परिचीत, अपरिचित ऐतिहासिक प्रसंग मांडले आहेत, त्यामुळे प्रत्येक इतिहास प्रेमीला हा ग्रंथ आवडणारच आणी ज्यांना इतिहासाची आवड नाही त्यांना इतिहासाचा लळा लावेल असाच हा ग्रंथ आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा अनुभव घ्यायलाच हवा..
मला या ग्रंथाने खूप काही भरभरुन दिलं, कवी दुर्गाप्रसाद जरी दिवंगत झाले असले तरी त्यांच्या काव्यग्रंथांतून ते आजही जिवंत आहेत हेच खरं.
शेवटी मला आवडलेली त्यांचं हे एक गीत.
घेवोनी उत्कंठेने
वाचावा गत इतिहास
भिजवावी त्याची पाने
सोडावा दिर्घोच्छ्वास
जीर्ण दुर्ग ते पाहोनी
व्हावे हो चित्त उदास
आठवून त्या त्या गोष्टी
लक्षून आजची सृष्टी
अंतरात व्हावे कष्टी
येती वच सहजची वदता
एक काळ ऐसा होता...
समीक्षण – सोहन पाटील
मी तीसरी – चौथीत (१९६०-६२) असतांना माझी आई हे सर्व पोवाडे अतिशय सुंदर चालींवर गात असे.मला रडू येत असे. त्यावेळचे जुने पुस्तक अजुनही डोळ्यांसमोर जसेच्या तसे आहे. कवीचे नांव आठवतेच. त्यातील चित्रे त्यावेळच्या छपाईनुसार एक-दोन रंगातच असायची. पण खुपच सुंदर. लवनेना हे शीर माते हा पुर्ण पोवाडा मला अजुनही वारंवार आठवतो. अंगावर शहारा येतो. आज मी ६९ वर्षाचा आहे. इतक्या वर्षांची माझी तृष्णा आपण तृप्त केली. मला ते मुळ पुस्तक हवे आहे.
राजन लंके
नाशिक
9423963938
वरील काव्य रचनेत
(जीर्ण दुर्ग ते पाहोनी)
नसून
पूर्व दिव्य ते पाहोनी
व्हावे हो चित्ती उदास
अशी शंका वाटते आपण
त्याचे निरसन करून सांगावे
9067476263
अतुल नलावडे