amiba marathi book review cover

अमीबा

पोस्ट शेयर करा:

कवी – श्रीकांत सिंधू मधुकर

समीक्षण – अमुल्या प्रवीणकुमार गवरे

प्रकाशन – अंतर्नाद प्रकाशन

मूल्यांकन – ४ | ५

“करूनि अंत माणुसकीचा

खेळूयात रक्ताची होळी

मी सरस की तु, ठरवूयात हे

चालव तू माझ्यावर गोळी!

आणि पडू दे सदा निष्पाप नात्यांचा

होऊ दे राखरांगोळी भावनांची

चेहऱ्यामागे लपवू चेहरे आपण

दुनिया राहिलीच कुठे अता माणसांची”

©️ श्रीकांत सिंधू मधुकर (अमीबा काव्यसंग्रह)

‘अमीबा’ हा कवीचा अनेक पुस्तकातील पहिला कवितासंग्रह. दिनांक १५ ऑगस्ट २०१८ मध्ये रायगडावर या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रकाशित झाली. कवितासंग्रहाच्या शीर्षकाबद्दल सविस्तर सांगताना तो, ” माणसाचे आयुष्य हे एक पेशीय स्वच्छंदी असावं. हवा तसा आकार घेऊन साऱ्यांच्या नजरेत बरोबर असणाऱ्या अमिबा सारखं. “अमिबा मागील अजून एका अर्थात दडली आहे त्यातील शब्दांची किमया.” ज्याच्या नावात ‘अ’ आईचा, ‘मी’ माझा व ‘बा’ बाबांचा आहे, तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.” यामुळेच या संग्रहाचे नाव अमिबा ठेवण्यात आले. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून देखील हाच अर्थ आपल्याला जाणवतो.

या काव्यसंग्रहात एकूण ६९ कविता आहेत. काही कविता मुक्तछंदात, तर काही छंदात आहेत. समाजातील विविध विषयांवर प्रकाशझोत टाकत असतानाच, काही कविता निसर्गावर, प्रेमावर, विरहावर, स्वाभिमानावर देखील आहेत. इतिहासारांवर आणि कवींच्या जीवनावर देखील मिळतील. कवितेची भाषा सोपी व कोणालाही समजेल पण तितकीच मनाला भावेल अशी आहे. प्रत्येक कवितेचे शिर्षकातूनच अर्थबोध होतो आणि त्यातीलच काही “किन्नर, रायबा, कवी, पाऊसकारण, समुद्र, सूर्यपुत्र” या कविता मनाला विशेष भावतात.

अर्थपूर्ण, सोप्प्या शब्दातील, मुक्तछंदातील कविता आवडणाऱ्या सर्व कविता प्रेमींसाठी हे उत्तम पुस्तक आहे. काही कविता फार जवळच्या वाटतील, काही मंत्रमुग्ध करतील आणि विशेषतः तरुण पिढीला या कविता नक्कीच आवडतील याची खात्री आहे. तसेच इंस्टाग्राम वर ‘एक होता कवी’ या अकाऊंट वरून तो रोज अनेक कविता लोकांपर्यंत पोहचवत असतो.

समीक्षण – अमुल्या प्रवीणकुमार गवरे

shrikant madhukar antarnad amulya pravinkumar amiba ameeba


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]
पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *