ikigai marathi book review cover

इकिगाई

पोस्ट शेयर करा:

लेखक – हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिररस

मराठी अनुवाद – प्रसाद ढापरे

समीक्षण – कुमार विश्वजीत

पृष्ठसंख्या – १९०

प्रकाशन – मायमिरर पब्लिशिंग हाऊस

मुल्यांकन – ३.५ | ५मधल्या काळात अचानक काही पुस्तकांची चर्चा जगभर झाली. त्यातलाच हे एक पुस्तक. बोलता बोलता या पुस्तकाने सगळीकडेच छाप उमटवली. पुस्तकात नेमकं काय आहे याचं सगळ्यांनाच एक कोड पडलं होत. अनेकांचं या पुस्तकाबद्दल दुमत आहे. मला वाटतं सगळ्यांनी हे आपापल्या परीने पहावं.

इकिगाई (दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य) हे पुस्तक हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस यांनी लिहिलेले असून या पुस्तकाचा मराठी अनुवाद  प्रसाद ढापरे यांनी अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

या पुस्तकात केवळ दीर्घ जीवन जगण्याचा हव्यास नाही तर अर्थपूर्ण जीवन! आनंदी जीवन! सुखी जीवन जगण्याची कला सांगितली आहे. प्रत्येकाने स्वतःचा इकिगाई शोधून जीवनात सतत कार्यरत राहल तर आयुष्य जगताना एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. जीवनाला एक वळण प्राप्त होते. म्हणजे त्यानी निवडलेले काम तो तल्लीन होऊन पूर्ण करतो. पण इथे आपण म्हणाल इकिगाई म्हणजे नेमकं काय तर इकिगाई या जपानी शब्दाचा मूळ अर्थ “स्वतःच्या अस्तित्वा मागील कारण” इकिगाई म्हणजेच नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आपण जन्माला आलो आहोत हे शोधणे.

सामान्य लोक अयशस्वी असण्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की ते स्वतःला तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला चांगल्या प्रकारे ओळखत नाहीत. या पुस्तकाच्या मागचा हेतू हाच आहे की स्वतःचा इकिगाई कसा सापडू शकतो, हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस यांनी घेतलेल्या जापनीज लोकांच्या मुलाखतीतून खालील मुद्द्यांचे रहस्य सामान्य जनतेस पोहोचवण्याचा अंतरभावाने प्रयत्न केला आहे:

      *             १) इकिगाई चे तत्व

      *             २) वय न वाढण्याचे रहस्य

      *             ३) लोगो थेरेपी ते इकिगाई

      *             ४) प्रवाहाचा शोध

      *             ५) दीर्घायुषी मास्टर्स

      *             ६) जपानमधील शतायुषी लोकांची शिकवण

      *             ७) इकिगाई खाद्यसंस्कृती

      *             ८) दृढता आणि  वाबी-साबी इत्यादी

साहित्यिक भाषा, मोठेमोठे शब्द,अलंकार या पुस्तकात असं काहीही पाहायला व वाचायला मिळत नाही. परंतु एक प्रेरणादायी पुस्तक म्हणून जापनीज लोकांची संस्कृती, राहणीमान किंवा त्यांनी मुलाखतीत सांगितले जीवनाचे रहस्य चित्रित केले आहे. म्हणून हे पुस्तक एकदा वाचण्यास काही हरकत नाही.

समीक्षण – कुमार विश्वजीत

ikigai hector gracia fransis prasad dhapre kumar vishwas mymirror
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *