लेखक – अंकुर वारिकू
पृष्ठसंख्या – २९१
प्रकाशन – जगरनॉट बुक्स
मुल्यांकन – ४ | ५
प्रसिद्ध यूट्युबर आणि उद्योजक अंकुर वारिकू हे त्यांच्या यूट्यूब व्हिडिओजमुळे चांगलेच चर्चेत आहेत. अर्थविषयक आणि तरुणांना मार्गदर्शक व्हिडिओज बनवण्यात ते तरबेज आहेत. फिक्स्ड डिपॉसिट वर त्यांचं विशेष लक्ष असतं. अंकुर हे त्यांच्या उत्पन्नाचा बराच भाग गरजुंना दान करतात. “डू एपिक शिट” असं विचित्र नाव असलेले पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. एकतर अंकुर यांनी पुस्तकाच्या सुरुवातीसच सांगितलं आहे कि हे पुस्तक तुम्ही एका क्रमानेच वाचलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही कधीही कोणतंही पान उघडून हे पुस्तक वाचू शकता.
“डू एपिक शिट” हे पुस्तक म्हणजे अंकुर वारिकू यांनी जगलेल्या आयुष्यच सार. ते अनुभवातून काय शिकले, त्यांचे विचार आणि मते त्यांनी स्पष्टपणे मांडली आहेत आणि तेही अगदी सोप्या आणि कमी शब्दांमध्ये. पुस्तक एकूण सहा भागांमध्ये विभागलेलं आहे यश, अपयश, सवयी, जागरूकता, उद्योजकता, अर्थ आणि नातेसंबंध. तुम्हाला यातील कोणत्याही विषयी सल्ला (किंवा अंकुर यांचा त्याविषयीचा अनुभव) हवा असेल तर ते प्रकरण उघडा आणि वाचा. तुम्ही हे पुस्तक क्रमाने देखील वाचू शकता. हे पुस्तक एखाद्या गोष्टीप्रमाणे लिहिलेलं नसून अंकुर यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांवरून लिहिलेलं आहे. प्रत्येक अनुभव आणि विचार हे बहुतांश एक ते दोन पानांत लिहिलेले आहेत. यांतूनच तुम्हाला अंकुर यांचा जीवनप्रवास देखील उलगडत जाईल. पुस्तकाच्या शेवटी अंकुर यांनी त्यांच्या मुलांसाठी लिहिलेली छोटेखानी पत्रे आहेत.
अंकुर वारिकू यांना उमजलेला जीवनप्रवास असा या पुस्तकाचा सोपा अर्थ आपण घेऊ शकतो. “डू एपिक शिट” हे एक नक्कीच वाचनीय पुस्तक आहे. हे पुस्तक तुमच्या मित्रासारखं तुम्हाला मार्गदर्शन करत राहील जेव्हा तुम्हाला त्याची आवश्यकता भासेल.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ