inside-marathi-books-your-next-five-moves-book-review-in-marathi

युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह

पोस्ट शेयर करा:

लेखक – पॅट्रिक बेट-डेव्हिड, ग्रेग डीनकिन   

पृष्ठसंख्या – २८९

प्रकाशन – गॅलरी बुक्स

समीक्षक – आकाश जाधव

मुल्यांकन – ४.३  l ५

“व्हॅल्यूटेनमेंट” या यूट्यूब चॅनेल मुळे प्रसिद्धी झोतात आलेले पॅट्रिक बेट-डेव्हिड यांनी सहलेखक ग्रेग डीनकिन सहित लिहिलेलं “युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह” हे पुस्तक आपल्याला व्यवसाय यशस्वीरीत्या कसा चालवायचा याबद्दल सांगत. लेखकाच्या मते व्यवसाय आणि बुद्धिबळ हे एकसमान आहेत. तुम्हाला व्यवसाय यशस्वीरित्या चालवायचा असेल तर तुम्हाला किमान तुमच्या पुढच्या पाच चाली ठाऊक असायलाच हव्यात. वरवर तुम्ही तुमच्या निर्णयाचे पाच वेगळ्या परिस्थिती अनाकलन आधीच करू शकता जेणेकरून निर्णयानंतर त्या परिस्थिती तुम्ही योग्य रीतीने हाताळू शकता. 

पुस्तक पाच प्रकरणांत (चालींमध्ये) विभागलेलं आहे. प्रत्येक प्रकरणात चाली विस्तृतपणे, संदर्भांसहित स्पष्ट केल्या आहेत. पॅट्रिक यांनी जागोजागी त्यांचे अनुभव पेरले आहेत जे नक्कीच कोणत्याही व्यावसायिकाला मार्गदर्शक ठरतील. पुस्तक पॅट्रिक यांनी खूप मनापासून लिहिलं आहे आणि त्यांचं यशस्वी उद्योजक बनवायचं ध्येय हे जाणवत राहत. 

भारतात काही घरांमध्ये व्यवसाय पुढच्या पिढीला शिकवला जातो (किंवा व्यवसायाचं बाळकडू घरातूनच मिळतं) तर काही घरांमध्ये व्यवसाय हा शब्दच प्रतिबंधित असतो. अशा घरातील तरुण/तरुणींना व्यवसायात धक्के खाऊन त्यातील बेसिक्स शिकावे लागतात. हे धक्के “युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह” हे पुस्तक नक्कीच काही प्रमाणात कमी करू शकतं. लेखकाने क्लिष्टपणा टाळला आहे जो सहसा आपल्याला इतर व्यावसायिक पुस्तकांमध्ये बघायला मिळतो. पॅट्रिक हे स्वतः यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी त्यांची विचारपद्धती जशी च्या तशी मांडली आहे. त्यांच्या जीवनातील वेचक प्रसंग पुस्तकात डोकावत राहतात. व्यवसायात सिस्टिम आणि प्रोसेसच महत्व ते तुम्हाला पटवून देतात. पुस्तकातील माझं सर्वांत आवडत वाक्य:

अमेरिकेत फक्त २०० डॉलर खर्चून तुम्ही तुमच्या कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) होऊ शकता. पण खरा फरक तेव्हा पडतो जेव्हा इतर लोक तुम्हाला CEO म्हणू लागतात.         

व्यवसाय म्हणजे काय?, तो कसा उभा करायचा?, कसा वाढवायचा?, व्यावसायिक शत्रूला कसं  थोपवायच, कंपनीमध्ये कल्चर कसं  असावं आणि ते कास निर्माण करावं?, तुमचे सर्वोत्तम कामगार सोडून न जावेत यासाठी काय करावं?, महत्वाच्या मिटींग्स पूर्वी काय आणि कोणती तयारी करावी?, छोट्या व्यावसायाला मोठं स्वरूप कास द्यायचं?, व्यवसाय डिजिटल कधी करायचा? अशा विविध प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. माझ्यामते हे “युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह” हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. जर तुम्ही व्यवसायात उतरणार असाल किंवा व्यवसाय विस्ताराच्या विचारात असाल तर हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे.

समीक्षक – आकाश जाधव

your next five moves akash jadhav gallery books


      ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]

पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *