प्रकार – ऑडिओ बुक
लेखिका – अनघा काकडे
वाचन – ऋचा आपटे
वेळ – २तास, ३०मिनट
प्लॅटफॉर्म – स्टोरीटेल
मुल्यांकन – ४.८ | ५
“मारवा”. नाव वाचूनच मी एकदम प्रसन्न झालो आणि हुरळून गेलो. काय असेल म्हणून मी उत्सुक होतोच, आणि त्यात छोटे छोटे पाच भाग आहेत जे तुमची उत्कंठा शिगेला नेतील. पुस्तक ऐकायला सुरवात केली. पुस्तकाची सगळी पात्र नव्या युगाची आहेत. भाषाही नव्या युगाची. छान आणि सुंदर मराठी इंग्लिश लहेजा. आणि सगळयात चपखल लागू पडणारी बाब म्हणजे “ऋचा आपटे” यांचा आवाज. खूपच सुंदर प्रकारे या पुस्तकाचं वाचन झालं आहे. त्यामुळे पुस्तक ऐकण्यात मजा येते. हा एक प्रकारे नवीन सिनेमा ही वाटतो, तर कधी कधी पुस्तकाची साज मनात उतरत आहे असही वाटतं. खूपच सुंदर लिखाण अतिशय साजेसे संवाद आणि त्याहूनही सुंदर म्हणजे या कथेची सुबक बांधणी.
आताच्या पिढीला (यंग जनरेशन ला) जस हवं असत, अगदीं तशीच ही प्रेम कहाणी आहे. प्रेमाची व्याख्या स्वतःच्या मनात बांधू पाहणारी, स्वतःची नवी ओळख एका क्षेत्रात करू पाहणारी एक सुंदर मुलगी. तिचे मित्र, तिचा अभ्यास, तिच समोर दिसणार करिअर आणि प्रेम. तिचं या पुस्तकात केलेलं वर्णन, तिच्या मनाची एक सतत होणारी द्विधा या पुस्तकाला अजूनच सुंदर बनवते. हे पुस्तक न थांबता सतत ऐकू वाटलं आणि संपल्यावरही ते ऐकू येत आहे, यातूनच पुस्तकाची खरी जादू, प्रभाव तुम्हाला समजला असेल, लेखिकेने पाहिलेले आणि दाखवलेले अनुभवांचे बारकावे पाहून बुद्धी थक्क व्हायला होते. लिहिण्यासारखं खूप आहे पण अजून या पुस्तकातील गोष्ट उलघडली तर ती मजा राहणार नाही. म्हणुन मला वाटत आहे, तुम्ही हे पुस्तक ऐकावे आणि स्वतः तो सुदंर अनुभव घ्यावा.
मी सगळ्यांना आवर्जून सांगेल, एकदा तरी हे ऑडिओ बुक नक्की ऐका. तुम्हाला हमखास आवडेल. पुस्तकाची मांडणी, आणि कथा सगळ्यांच्या मनाला भिडणारी आहे. हे पुस्तक तुम्हाला एका नव्या विश्वात नक्कीच घेऊन जातं. माझ्या काही खास आवडीच्या पुस्तकात मी याला मोजू लागलो आहे. संभाषणाची ताकत या पुस्तकांतून तुम्हाला समजेलच. आवर्जून ऐकावी अशी गोष्ट आहे, तुम्हालाही आवडेल नक्की ऐकायला.
आजच हे पुस्तक ऐकलंय आणि त्यानंतर आता लगेचच हा रिविव्ह वाचला. अनेक गोष्टी, कथा, कविता, कांदंबर्या आपण ऐकत असतो, वाचत असतो. परंतु त्याचं नेमकं समीक्षण जमायला हवं. ते तुम्हाला साधता आलंय. 👌💯