vishwast-marathi-book-review-cover

विश्वस्त

पोस्ट शेयर करा:

लेखक – वसंत वसंत लिमये

प्रकाशन – राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या – ५२३

मुल्यांकन – ४.५ | ५

समीक्षण – प्रज्ञा कडलग

रहस्यमय कथा वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकांचा फडशा पाडत असतानाच हातात आली वसंत वसंत लिमये लिखित ‘विश्वस्त’ कादंबरी, आणि मग काय कहरच! ज्ञात इतिहासाला कुठेही धक्का न लावता त्याचा आगळा वेगळा अन्वयार्थ लावण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न वाचकांना जागीच खिळवून ठेवण्यात पूर्णतः यशस्वी झालेला आहे.

पुण्यातील कॅफेत अड्डा जमवणारा JFK ग्रुप ही म्हणजेच ही 5 मुले, जी गिर्यारोहणाचा छंद व इतिहासाबद्दलच्या असलेल्या आकर्षणामुळे एकत्र येतात व गड किल्ले फिरता फिरता असे काही पुरावे गोळा करतात ज्यामुळे गूढ इतिहासाची उकलच होते की काय असे वाटते. कथानकाचा पाया आहे श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका व तेथील अगणित संपत्ती. द्वारका बुडताना संपत्तीचे काय झाले? श्रीकृष्णाने संपत्ती वाचविण्यासाठी काही प्रयत्न केले का? की मिळालेले हे सारे वैभव भविष्याच्या हवाली करत असताना, जन कल्याणासाठी उपयोग करणार्‍या निर्मोही, सत्पात्री वारसदाराच्या हाती पडण्यासाठी काही तजवीज केली होती का? अखेर ती योजना पूर्ण झाली का? अशा अनेक घटनांचा संदर्भ घेत, या गोष्टींचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न JFK टीम घेत होती.

एकीकडे हा खटाटोप चालू असताना इतिहासातले अनेक संदर्भ, वर्तमानातल्या चालू घडामोडी समोर येतात. टीमला अगदी परदेशातून होणार्‍या हल्ल्यांना देखील तोंड द्यावे लागते. राजकीय वावटळ, वाईट प्रवृत्ती ह्या सगळ्यांचा निकराने प्रयत्न करत असताना अखेर JFK टीम यशस्वी होते का, वाघा – निर्मोही व सत्पात्र वारसदार बनतो का, हे जाणून घेण्यासाठी कादंबरी वाचलेलीच उत्तम!

मराठी मध्ये ‘डॅनियल ब्राऊन’चा अनुभव यावा अशी ही कादंबरी एकदा हातात घेतली की पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवूच वाटत नाही. इतिहास, सत्य आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर राहून कथानक उलगडत असतानाही इतिहासाचे विकृतीकरण कोठेही होऊ न देता, आवर्जून वाचावी अशी कादंबरी लेखकाने वाचकांच्या हाती सुपूर्द केली आहे.

समीक्षण – प्रज्ञा कडलग

pradnya kadlag rajhans vasant limaye


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/author/5225/vasant-vasant-limaye”]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *