लेखक – बाळ फोंडके
समीक्षक – रेणुका साळवे
प्रकाशन – एन बी टी
पृष्ठसंख्या – २१५
मुल्यांकन – ३.८ | ५
विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टी आपण ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. विक्रम हा एक सर्वगुणसंपन्न, वैभवशाली आणि हुशार असा लोकप्रिय राजा आणि त्याचे काम म्हणजे सर्वांना त्रास देणाऱ्या वेताळाला कैद करणे. पण या वेताळाला खांद्यावर घेऊन जाणे ही काही सोपी गोष्ट नाही दरवेळी वेताळ काहीतरी क्लुप्ती शोधून विक्रमला स्वतःचे मौनव्रत तोडायला लावतो आणि ठरलेल्या भविष्यवाणी प्रमाणे विक्रमच्या तावडीतून सुटून पुन्हा झाडावर जाऊन लटकतो. अगदी याच कथेचा संदर्भ घेत बाळ फोंडके यांनी “अबाउट टाईम” हे अत्यंत सुरेख पुस्तक लिहिले आहे.
बाळ फोंडके यांचे अनेक लेख जवळपास सर्व प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांमध्ये झळकलेली आहेत. लंडन विश्व विद्यापीठातून त्यांनी Biophysics Immunology या विषयांमध्ये डॉक्टरेट मिळवून त्यानंतर “होमी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर”, मुंबई येथे आघाडीचे शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावर एनसीएसटीसी राष्ट्रीय पुरस्कार तसेच आय. एन. एस. ए. इंदिरा गांधी पुरस्कार, बीसी देव मेमोरियल बोर्ड, इत्यादी पुरस्कारांवर ती स्वतःच्या नावाची मोहर उमटवली. तसेच तसेच सीएसआयआर या नामी संस्थेमध्ये त्यांनी डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचणे म्हणजे एक सुखद अनुभव आणि एक नामी संधी आहे.
अबाउट टाईम या पुस्तकाच्या नावात खुलासा असल्याप्रमाणे हे पुस्तक आपल्याला टाईम म्हणजेच वेळेबद्दल सखोल माहिती देत राहतं.मानवाने वेळेची संकल्पना का तयार केलीअसेल? वेळेला मोजण्यासाठी त्याने कशाकशाचा आधार घेतला असेल? किंवा वेळ हा नेहमी एकाच दिशेने वाहतो तर असे का होते? किंवा तो कधी थांबेल की नाही? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळतात. त्याच प्रमाणे लेखकाने वेळोवेळी अनेक महान शास्त्रज्ञांच्या कार्याचा संदर्भ दिलेला आहे जसे की आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, गिल्बर्ट रोहम व अनेक ऐतिहासिक गोष्टींचा उदाहरणार्थ फ्रान्स ची क्रांती, Octagonal Tower, यांचा संदर्भ घेत वेळे बद्दलची माहिती अजून रंजक करून ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण वाचताना आपल्याला नवनवीन माहिती कळत राहते.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये त्यांनी वापरलेली भाषा, पुस्तकातील वाक्याची रचना अतिशय छान आहे. तसेच अनेक समान अर्थान साठी वेगवेगळे शब्द वापरले आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षणी हे पुस्तक कंटाळवाणे वाटत नाही. उलट आणखी जाणून घेण्याची इच्छा वाढत जाते. हे पुस्तक समजण्यासाठी आपल्याला एकदम सखोल वैज्ञानिक माहिती असावी अशातलाही भाग नाही, कारण लेखकाने अगदी सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच बाळ फोंडके यांच्या लिखाणाची तुलना स्टीफन हॉकिंग यांच्याशी केल्यावाचून राहवत नाही. ऐतिहासिक गोष्टीबरोबर यांनी अनेकदा पृथ्वीच्या भौगोलिक परिस्थिती बाबतही अनेक उदाहरणे दिलेली आहेत, त्यामुळे विद्यार्थिदशेत असणाऱ्या मुलांनी तरी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे मला वाटते.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ