लेखक – मासाजी इशिकावा
इंग्रजी अनुवाद – रिसा कोबायाशी आणि मर्टीन ब्राऊन
प्रकाशन – ऍमेझॉन क्रॉसिंग
समीक्षक – सुखदा गंगेले-पारखी
पृष्ठसंख्या – २७८
मूल्यांकन – ४ । ५
सध्या जगावर युक्रेन आणि रशिया यांच्यादरम्यान होणाऱ्या युद्धाचे सावट पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर युद्ध तसेच वसाहतवाद ह्यांच्ये सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारे भयावह दूरगामी परिणाम याची कथा म्हणजे “अ रिव्हर इन डार्कनेस – वन मँन्स एस्केप फ्रॉम नोर्थ कोरिया “ हे आत्मचरित्र.
१९५० – १९८० च्या दशकात एक लाखाहून अधिक कोरियन तसेच २००० जपानी नागरिक जपान मधून नॉर्थ कोरिया ला स्थलांतरित झाले. इतिहासात या घटनेची नोंद केली गेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कॅपिटल जपान मधून सोशलिस्ट नॉर्थ कोरियाला स्थलांतरित होण्याची ही एकमेव घटना आहे.
नॉर्थ कोरियाने आश्वासन दिलेले पृथ्वीवरील स्वर्ग हा पोकळ दावा लक्षात आल्यानंतर या लोकांचा प्रचंड भ्रमनिरास झाला. परंतु वस्तुस्थिती स्वीकारण्याशिवाय या लोकांकडे गत्यंतर नव्हते.
मूळ पुस्तक जपानी भाषेत लिहिलेले आहे. मासाजिने अतिशय समर्पक शब्दांत तीस वर्षाचा त्याच्या आयुष्यातील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कम्युनिस्ट आणि हेकेखोर राजवटीचा अधीन व्यतीत केलेला कालखंड आणि जपानला पळून जाण्याचा प्रयत्न याची कथा म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक केवळ नोर्थ कोरिया च्या राजवती बद्दल नसुन माणसाच्या प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावादाचे द्योतक आहे.
जापनीज आई आणि कोरियन वडील त्यांचे अपत्य . मासाजि याचे सगळे आयुष्य म्हणजे स्वतःच्याअस्तित्वाचा शोध. हा शोध अधिकच गुंतागुंतीचा होतो जेव्हा वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी मासाजिचे संपूर्ण कुटुंब नोर्थ कोरियाला स्थलांतरित होते. नोर्थ कोरियात गेल्यावर या कुटुंबाला समाजातल्या सर्वात खालच्या थरात घराचा दर्जा देण्यात येतो.
कोरियन नागरिक असलेले मसाजी चे वडील हे उत्तम रोजगार, मुलांना शिक्षण, निवारा आणि समाजात उच्च दर्जा या नोर्थ कोरियन सरकारच्या भूलथापांना बळी पडून जपान होऊन कोरियाला स्थलांतरित होतात. परंतु वास्तव याच्या अगदी उलट असते . कुटुंबाला सोसाव्या लागणाऱ्या दुर्दम्य हालअपेष्टांचे हृदयद्रावक प्रवास म्हणजे हे पुस्तक. याशिवाय चीन, जपान आणि नोर्थ कोरिया चे परस्पर संबंध हे देखील पुस्तक वाचताना लक्षात येते.
मूळ पुस्तक जपानी भाषेत असून इंग्रजी आवृत्ती अनुवादित आहे. परंतु अनुवाद करताना मूळ विषयाला धक्का न लागू देण्याची तारेवरची कसरत लीलया पेलली गेली आहे.
लेखकाची लिखाणाची शैली अत्यंत साधी सोपी सर्वसामान्य लोकांना समजेल अशी आहे.
ज्या वाचकांना सत्य-कथा ,आत्मचरित्र,देश-विदेशातील आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याचे सामान्य लोकांवर होणारे परिणाम याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असेल त्यांना हे पुस्तक नक्की आवडेल. अत्यंत गंभीर विषयावर पुस्तक असून देखील लेखक वाचकांना बांधून ठेवण्यात यशस्वी होतो.
समीक्षक – सुखदा गंगेले-पारखी
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ