inside-marathi-books-born-a-crime-book-review-in-marathi

बॉर्न अ क्राईम

पोस्ट शेयर करा:

लेखक –  ट्रेव्हर नोवा

प्रकाशन – जॉन मूर

समीक्षक – सुखदा गंगेले-पारखी

पृष्ठसंख्या – ३०८

मूल्यांकन – ४ । ५

अमेरिकास्थित दक्षिण आफ्रिकन कॉमेडियन ट्रेव्हर नोवा हे नाव द डेली शो या कॉमेडी सेंट्रल चॅनल वरील कार्यक्रमामुळे चिरपरिचित आहे.

बॉर्न अ क्राईम हे पुस्तक म्हणजे ट्रेव्हरचे वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेतल्या जन्मापासून वयात येईपर्यंत व्यतीत केलेल्या कालखंडाचा प्रवास.

टोकाच्या वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेत श्वेतआणि कृष्णवर्णीय लोकांमधील संबंध अनधिकृत मानले जायचे. अशा समाजरचनेचा भाग असलेल्या जर्मन (स्विस) वडील आणि आफ्रिकन आईचे अपत्य ट्रेव्हर ने दक्षिण आफ्रिकेत व्यतीत केलेल्या कालखंडाचा आठवणी या पुस्तकात अतिशय समर्पक शब्दात मांडलेल्या आहेत. .

“I don’t regret anything I’ve ever done in life, any choice that I’ve made. But I’m consumed with regret for the things I didn’t do, the choices I didn’t make, the things I didn’t say. We spend so much time being afraid of failure, afraid of rejection. But regret is the thing we should fear most. Failure is an answer. Rejection is an answer. Regret is an eternal question you will never have the answer to. ‘What if . . .’ ‘If only . . .’ ‘I wonder what would have . . .’ You will never, never know, and it will haunt you for the rest of your days.”

पुस्तकाचे शीर्षक बॉर्न क्राईम हे ट्रेव्हर च्या अनधिकृत जन्माचे प्रतीक आहे

ट्रेव्हरची आई ही प्रचंड वर्णद्वेषी अफ्रिकेतील कायम स्वतःच्या पायावर उभी असलेली स्वतंत्र मतांची व्यक्ती होती. तिच्या याच गुणांचा प्रभाव ट्रेव्हर वर असल्याचे पदोपदी जाणवते. स्वभावाने अत्यंत खोडकर ट्रेव्हर सतत काहीना काही उपद्व्याप मुळे अडचणीत यायचं. त्याचा ब्राऊन स्किन मुळे अनेक वेळा त्याचा निभाव लागला .त्याला त्याच्या चुलत मावस कृष्णवर्णीय भावंडांमध्ये कायम त्वचेच्या रंगामुळे वेगळी वागणूक मिळत असेल .

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील बालपण असो,डोक्यावर छप्पर नसताना कारच्या मागच्या सीटवर झोपणे असो अथवा जेवणात किडे खायला मिळणे असो .परंतु अशा कठीण परिस्थितीत देखील सकारात्मकतेने परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे ट्रेव्हर घडत गेला. पुस्तकात अतिशय गंभीर प्रसंग देखील विनोदी पद्धतीने मांडण्याच्या अलौकिक शैलीमुळे पुस्तक कोठेही कंटाळवाणे होत नाही.

 ट्रेव्हरच्या आईचा अतिशय स्वावलंबी, मिस्किल ,कष्टाळू स्वभाव तसेच प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत मुलावर योग्य संस्कार करण्याची धडपड हे देखील पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे .परंतु काही वेळेस चुकीचे निर्णय घेतल्यावर येणारे शून्यता पण त्यातूनही मार्ग काढण्याच धडपड लक्ष वेधून घेते.

पुस्तक ऑडीबल वर देखीलउपलब्ध आहे . विशेष म्हणजे पुस्तकाचे वाचन ट्रेव्हर ने स्वतः खुमासदार शैलीत केले आहे त्यामुळे ऑडीबल आवृत्ती देखील वेगळा आनंद देऊन जाते.

जर तुम्हाला गंभीर विषय विनोदी पद्धतीने हाताळणारी तसेच जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन यशाच्या शिखरावर पोहोचणारी व्यक्तींची पुस्तक वाचायला आवडत असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.

समीक्षक – सुखदा गंगेले-पारखी

born a crime trevor noah john murray sukhada gangele parakhi


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]




संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *