inside-marathi-books-shivratra-marathi-book-review

शिवरात्र

पोस्ट शेयर करा:

लेखक – नरहर कुरुंदकर

समीक्षक – लेशपाल जवलगे

पृष्ठसंख्या –१८६

प्रकाशन – देशमुख आणि कंपनी

मुल्यांकन – ४.५ | ५

धार्मिक मूलतत्त्ववादी लोकांसमोर त्यांच्याच एखाद्या मेळाव्यात त्यांच्याच मतांना खोडून काढण्यासाठी एक निर्भयपना लागतो, ज्यासाठी तेवढाच धर्माभ्यास आणि आधुनिक मूल्यांच्याद्वारे केलेली चिकित्सा आणि तर्कवाद हे वादादीत असावे लागतात जे कुरूंदकरांच्या कडे होते म्हणूनच ते शिवरात्र लिहू शकतात.

‘या देशातील सेक्युलर म्हणवणाऱ्यांनी दर वेळी जातीयवाद्यांना इतक्या वेळा शरणागती दिली आहे की, सेक्युलर आणि समाजवादी मंडळींना कुणी फारसे भिण्याची गरजच उरलेली नाही…’ हे वाक्य आजही जशास तसं लागू होतं..

शिवरात्र मधील लेख आहेत १९६०-८० कालखंडातील.

पुस्तक ३ भागात विभागलेलं आहे.. 

सुरुवात होते गोळवलकर गुरुजींच्या चातुर्वर्ण्य मान्यतेपासून आणि बापूंना “राष्ट्रपिता” म्हणून सर्वधर्मीयांच्या मान्यतेच्या चिकित्सेपासून … याच भागात कुरुंदकरांनी नथुरामचे बंधू गोपाळ गोडसेंच्या “गांधी हत्या आणि मी” या पुस्तकाबद्दल त्यांना चांगलेच झोडपून काढलं आहे. 

स्वातंत्र्य चळवळीशी असणारा सर्व हिंदुत्ववाद्यांचा आणि rss चा बेजबाबदार घटस्फोट तुम्हाला कधी ना कधी स्वीकारावा लागेलच हे ते ठणकावून सांगतात. 

लढले बापू.. मात्र हे लढणारे किती बावळट आहेत याची मिटक्या मारत वर्णने केली याच हिंदुत्ववाद्यांनी.. न लाढणाऱयांचा हा वाचाळपणा सतत २५ वर्षे केलेला स्वातंत्र्यद्रोहच होता आणि  यांच्याच विचारांचा वारसा जपणारे आजचे राजकीय देशभक्त खरं तर गांधींना मनापासून स्वतंत्र्यलढ्याचे नेते मानण्यास तयार नसतात हे कुरुंदकर स्पष्ट सांगतात.. ते आजही लागू होतं

संघी लोकं कारण देताना सांगतात तेव्हा आमची शक्ती लहान होती.. “शक्ती लहान असणे गुन्हा नसतोच , स्वातंत्र्यलढा सुरू असताना ती न वापरणं मात्र नक्कीच गुन्हा असतो” मात्र दुसरीकडं हैद्राबाद च्या निझामावर बॉम्ब फेकणारे पण गांधी-नेहरूंचा जयजयकार करणारे आवाज होते हे कटुसत्य मात्र यांना झोंबतं.. 

या हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कधी कासीम रझवी दिसला नाही, निझाम किंवा जिन्हा दिसले नाहीत, यांची गोळी कधी इंग्रजांच्या विरोधात पण झाडली गेली नाही  याचं स्पष्टीकरण देण्यासाठी कुरुंदकर उद्युक्त करतात हे शहारे आणणारं आहे.

तिसऱ्या भागात भारतातील धर्म-जात यांच्यावर आधारित राजकारणामध्ये आणि मुसलमानांच्या प्रश्नांमध्ये देशातील समस्यांची मुळं दडलेली आहेत हे ठामपणे सांगतात. 

एकंदरीत समाजातील भांबावलेल्या कट्टरतेवर  नरहर कुरुंदकरांनी बिनदिक्कत आपल्या अभ्यासू शैलीत ताशेरे ओढले आहेत मग ती कट्टरता हिंदू असो वा मुस्लिम..

समीक्षक – लेशपाल जवलगे


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/4685/shivratra-narahar-kurundakar-deshmukh-and-company-publishers-pvt-ltd–buy-marathi-books-online-at-majesticreaders-9788193449417″]
पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *