inside-marathi-books-tel-navach-vartman-marathi-book-review

तेल नावाचं वर्तमान

पोस्ट शेयर करा:

लेखक – गिरीश कुबेर

पृष्ठसंख्या – ३३२

प्रकाशन – राजहंस प्रकाशन

समीक्षण – लेशपाल जवलगे

मूल्यांकन – ४ । ५

हा तेल नावाचा इतिहास आहे, अधर्मयुद्ध , एका तेलियाने या त्रिवेणी नंतरचा दुसरा अध्याय…

ऊर्जा आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि अर्थकारण ही या नाण्याची कडा… 

अनेकांचा उर्जान्धळेपणा दूर करणारं, तेलसाक्षरता जागवणारं पुस्तक “मी नेहमीच काळाच्या पुढे राहिलो” असं सांगणाऱ्या निकोला टेस्लाना अर्पण केलं आहे.

इतकी शतकं तेलावर पोसलेल्या, औद्योगिक प्रगतीची फळं चाखणाऱ्या, निसर्गावर मात करू पाहणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याच्या यापुढचा जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणाऱ्या या खनिज तेलाच्या रक्तरंजित इतिहासानंतर तितक्याच रक्तरंजित वर्तमानाचा आणि भविष्यात डोकावणारा वेध म्हणजे हे “तेल नावाचं वर्तमान”. सुरुवात होते तेलठिपक्यांच्या रांगोळीपासुन.

इतके दिवस आपण ज्याला पोसला, तो सौदी अरेबियाचा ओसामा बिन लादेन आणि त्याची अल कईदा ही दहशतवादी संघटना, इराणविरोधी लढ्यात ज्याला भरभरून शस्त्रास्रं…. अगदी जैविकसुद्धा…. दिली तो सद्दाम हुसेन, सोविएत रशियाविरोधात ज्यांना आपण पाळलं ती तालिबान – असे सर्वच ९/११ च्या निमित्तानं आपल्या विरोधात एकवटल्याचं अमेरिकेनं पाहिलं आणि त्या देशाच्या पश्चिम आशियाबाबतच्या धोरणाचीच माती झाली.

2001 च्या या हल्ल्यानं अमेरिका समूळ हादरली, तिला हा सुडाग्नी शांत करण्यासाठी एक बकरा हवा होता तो त्यांना आयता भेटला सद्दाम ने आपल्या देशातल्या तेल कंपन्याचं राष्ट्रीयीकरण केल्यामुळं त्याच्याच रूपानं. 

खरं तर अमेरिका महासत्तेची खिल्ली उडवनाऱ्या क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोला opec निर्मात्या अल्फान्झो च्या व्हेनेझुएला मधून अध्यक्ष चावेझ अत्यंत स्वस्त दरात तेलपूरवठा करून अमेरिकेच्या जखमांवर पेट्रोल-डिझेल चोळत होते खरं पण तूर्तास या चावेझ आणि त्याच काळात उदयास आलेल्या पुतीन आणि खरा सूत्रधार सौदी यांचं बुश काहीही वाकडं करू शकत नव्हते. मग त्यांनी सोपा मार्ग निवडला, 9/11 चे आरोप इराकवर थोपवून सद्दामची नांगी ठेवण्याचा.

2 हेतू होते , पहिला सद्दामचा शेवट करून आपली इज्जत सांभाळण्याचा आणि दुसरा इराकमधील प्रचंड तेलसाठ्यांवर कब्जा. 

दुसरीकडं ते तालिबानी  लादेन ला सोडायला तयार नाहीत म्हटल्यावर तिथंही अमेरिकेनं हल्ला केला आणि अफगाणिस्तान ला कायमचा अस्थिर करून टाकला तो आयतागायत सावरतोय. 

अशीच काहीशी अवस्था अमेरिकेनं इराक-इराण-उत्तर कोरिया- सीरिया इत्यादींची सुद्धा करून ठेवली आहे हे कटू सत्य.

Finally सद्दाम ला फासावर लटकवलं पण खोट्या आरोपाखालीच हे संरक्षणमंत्री कोलिन पोवेल यांनी कबूल सुद्धा केलं. पण यातून एक नवीनच पिल्लू जन्माला आलं- “आयसिस” आणि तेलाच्या बॅरलमधला हा राक्षस तेलठीपक्यांची रांगोळी घालण्यासाठी बाहेर पडला … कधीही जेरबंद न होण्यासाठी.

पश्चिम आशियातल्या रखरखीत वाळवंटात मुबलक आढळणारं खनिज तेलाचं काळं सोनं आयसिसनं जितकं परिणामकारकपणे वापरलं, तितकं ते आतापर्यंतच्या कोणत्याही इस्लामी दहशतवादी संघटनेला जमलं नव्हतं. या ज्वालाग्राही तेलावर पूर्णपणे पोसली गेलेली पहिली दहशतवादी संघटना म्हणजे आयसिस. मोक्कार श्रीमंत आणि वरून रशिया,  अमरिकेसारख्या बकासुरांचा डोक्यावर हात मग स्थानिक सरकारं तर त्यांचीच… इराकी आणि सीरियन संघटनांच्या मेळानं तयार झालेली. भुकेल्या, भविष्याची भ्रांत असलेल्या जनतेला धर्म नेहमीच भुरळ घालतो आणि या धर्माच्या आधारे आपली सत्तेची पोळी भाजून घेणारेही त्यामुळं यशस्वी होतात. आयसिसने तेच केलं. मग हा सरकारचा धर्म आणि अधर्माची सरकारं अगदी खाली दक्षिण आफ्रिकेतसुद्धा फोफावली…

पुढे अरबी वसंत आणि आफ्रिकेतील पेटलेली आग सांगताना लेखक लिबियाच्या कर्नल गडाफिंचा नरसंहार दाखवतात. चांगला हुकूमशहा कधीही आपल्या जवळचा कोण , लांबचा कोण, उत्तराधिकारी कोण याचा कोणताही सुगावा लागू देत नाही. पूर्ण सत्ता हातात ठेवायची पण आपण सत्ताभिलाशी नाही असं दाखवण्यात तो वाकबगार असतो. यातलेच गडाफी.. यांचा काटा अमेरिकेने काढला फ्रान्सच्या मदतीने पण आशियायी वाळवंटापूरता  असलेला हा आयसिसचा राक्षस पुढे अमेरिकेच्या हव्यासामुळं आफ्रिकेच्या दारिद्र्यालाही ग्रासून गेला हे दिसतं. 

2011 मध्ये 9 वर्षानंतर केलेला ओसामा बिन लादेन चा तित्तथरारक अंत सांगून कुबेर 2008/9 चं subprime crisis मध्ये जगाने अनुभवलेले हेलकावे मात्र मनमोहन सिंगांनी सवरलेला भारत सांगून इथेच अमेरिका मात्र तेलाच्या बाबतीत कसकसा स्वयंपूर्ण होत गेला ते स्पष्ट करतात.

मानसोपचार तज्ज्ञ मद्य वा धूम्रपानाच्या आहारी गेलेल्याचं व्यसन सुटावं म्हणून एक क्लृप्ती करतात. म्हणजे सिगरेट वा मद्याची तलफ आली, तर व्यसनग्रस्ताला सुचवतात – अशा वेळी तू सुपारी किंवा लिमलेटची गोळी चघळ वगैरे यातून बऱ्याचदा रोगी सिगरेट वा मद्याच्या व्यसनातून सुटतो. पण तात्पुरताच.

नंतर त्याचं हे व्यसन तर बळावतंच, पण मधल्या उपायांमुलं सुपारीही त्याला आपल्या व्यसनपाशात ओढते.

असच झालं अमेरिकेचं. खनिजतेलाच्या व्यसनमुक्ती साठी प्रयत्नात फ्राकिंग तंत्रज्ञान आणि पुढं बॉलिव्हियातील लिथियम साठ्यांचं व्यसन यांना कधी जडलं कळालं देखील नाही.

2008 crisis नंतर अमेरिकेनं उतरवलेलं व्याज दर त्यामुळे वाढलेले तेलदर आणि ओबामा नंतर डॉलर मजबूत करण्याच्या नादात आणि सौदी-रशिया टेलउत्पादन स्पर्धेत 2014 पासून 4-5 वर्ष सतत निम्म्याने ढासळले तेलाचे दर यातून भारतीय अर्थव्यवस्था फायदा घेत उभारी घेईल असं सर्वांना वाटलं सुद्धा म्हणूनच अच्छे दिन चे स्वप्न सुद्धा पडू लागले पण आपल्या सरकारला मधून च कोण जाणं निश्चलीकरणाची आणि GST ची अवदसा आठवली.. इथं जे आपलं कंबरडं मोडलं ते मोडलंच.

पुढे लेखक नव्या युद्धाची तयारी सांगून इलॉन मस्क च्या टेस्लाची उदयकहानी सांगून पुन्हा तेलयुध्दतील नवीन विटी मात्र दांडू हे सर्व जुनेच कसे स्पष्ट करतात.  आणि सध्याचं वर्तमान आणि आपल्या भारताची उर्जाभुकेची गरज आणि तयारी सांगून  पुस्तकाची सांगता करतात.

समीक्षण – लेशपाल जवलगे

tel navach vartman girish kuber leshpal javalge rajhans


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *