inside-marathi-books-suvarnagarud-marathi-book-review

सुवर्णगरुड

पोस्ट शेयर करा:

लेखक – मारूती चितमपल्ली

प्रकाशन – साहित्य प्रसार केंद्र

पृष्ठसंख्या – १२०

समीक्षक – अक्षय सतीश गुधाटे

मुल्यांकन – ३.७ | ५

निसर्ग वाचन करावं या हेतूनं मी मारुती चितमपल्ली यांची नऊ पुस्तकं विकत घेतली, त्यातील चार पुस्तकं मी या आधी वाचली आहेत. बहुतांश पुस्तकांमध्ये ललित लेख आहेत. सुवर्णगरुड हे पुस्तक देखिल अनेक ललित लेख एकत्र घेऊन तयार करण्यात आले आहे. पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला पुस्तकं घेऊ वाटतात आणि वाचू वाटतात. तसच यादेखिल पुस्तकाच्या नावावरूनच हे पुस्तकं मला वाचू वाटलं.

लेखकाची जमेची बाजू म्हणजे त्यांची लेखन शैली. त्यात कुठेही मरगळ जाणवत नाही. कुठेही उगीच काहीतरी लिहिलं आहे अस वाटत नाही. ५ पुस्तक हातात घेऊनही आणि त्याच निसर्गावर वाचताना देखिल मला तितकाच उत्साह होता हे जरूर नमूद करावं वाटतं. या पुस्तकात त्यांनी गरुड, मोर, नाकेर, खंड्या या पक्षांची, साप, नाग व अजगर यांची वर्णनं केली आहेत तर त्याच सोबत खारुताई, मुंगूस, कोल्हा, हरिण, वाघ यांच्या बद्दल ची महिती आणि वर्णनं आपल्या आयुष्यातली घटनांसोबत गुंफून सांगितली आहेत.

या पुस्तकांत लेखकाने पहिल्यांदा दोन व्यक्तींबद्दल कथा लिहिल्या आहेत याचं मला विशेष वाटलं. परंतु या पुस्तकातील दोन लेख मी आधी वाचालेल्या “जंगलाचं देणे” याच पुस्तकात देखिल आहेत. त्यामुळे काहीसा हिरमोड देखील होतो. चितमपल्ली यांचं लिखाण नेहमीच मला आवडत आलं आहे. त्यांची चौकस, अभ्यासू बुद्धी.. अरण्याची जाण आणि आगळवेगळी लेखनशैली तुम्हाला पुस्तकाच्या प्रेमात पाडेल.  हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा.

समीक्षक – अक्षय सतीश गुधाटे

suvarna garud maruti chitampalli sahitya prasar kendra akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]
पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *