काजव्यांचं झुंबरinside-marathi-books-kajwyanch-zumbar-akshay-gudhate-marathi-poem-book

१५ ऑगस्ट २०२१

लवकरच आपल्या भेटीस येत आहे, एक अविस्मरणीय काव्यसंग्रह!!

काव्यसंग्रह : काजव्यांचं झुंबर!
कवी : अक्षय सतीश गुधाटे.
किंमत : १५० रुपये.


akshay-gudhate-inside-marathi-books

अक्षय सतीश गुधाटे.

“काजव्यांचं झुंबर” या माझ्या कविता संग्रहात सगळ्याच कविता वेगवेगळ्या आहेत. त्यांना ठराविक असा आशय नाही, विषय नाही, छंद नाही, वृत्त नाही.. हे सारेच संवेदनांचे मुक्त काजवे आहेत, मला जमतील त्या प्रमाणे झुंबराच्या स्वरूपात तुमच्याकडे सुपूर्त करीत आहे. आशा करतो तुम्हाला हे काजवे आवडतील, तुमची त्यांच्याशी जवळीक होईल आणि आयुष्यभराच्या सोबतीचा दुवा बनतील.

तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट्स द्वारे नक्की माझ्यापर्यंत पोहचावा.


तुमच्या पुस्तकाचे स्वतंत्र पेज बनविण्यासाठी 8208106722 / [email protected] वर संपर्क साधा.


15 Comments

 • पाण्याच्या खोल तळाशी पडलेला शब्द तरंगून आल्यावर त्याचं फूल होतं का??

  तसंच झालं आहे या काजव्यांच्या झुंबरातील कवितांचं …

  या कविता वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर आपलं एकंदरीत असणंच मांडत आहेत… या दृष्टीने बघितलं तर या कविता आपला भोवताल पण विसरत नाहीत, उलट तो भोवतालच कवेत घेताना दिसतील…

  खरंतर अक्षय दादा कितीही निरागसपने तसे त्यांचे कुठल्याही भावनांशी घेणे देणे नाही, असं म्हणत असले. तरीसुद्धा पुन्हा याच कविता वाचताना त्यांच्याही त्या क्षणांचा मोर होत असेलच.. भर उन्हातही… आणि विस्कटलेल्या पाकळ्यांसारखं त्यांचं आयुष्य सुद्धा बहरण्यासाठी हे अक्षयरूपी काजव्यांचा झुंबर नक्कीच निमित्त ठरत असेल…

  कविता खुप आवडल्या 😍😍…

  पुढील अवृत्तीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

 • Finally..
  इतक्या प्रतीक्षेनंतर आणि इतकी उत्सुकता असलेलं काजव्यांचं झुंबर हाती पडलं.😌
  पुस्तकाच्या नावाप्रमाणेच एक आणि एक कविता स्वतःमध्ये खास आहे. जसं काजव्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा प्रकाश असतो अगदी तसं!!
  कविता वाचल्यानंतर कुठे ना कुठे आपल्याशी निगडित आहेत की काय असं वाटत होतं. आपल्या जवळच्या आहेत असं वाटतं.♥️
  मायबाप, देव वेशीवर टांगलाय, मोठी झालीस, चहा ह्या कविता तर खूपच भावल्या.
  सगळ्या कवितांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे.. जसं समुद्राच्या किनारी चालता-चालता अनेक शंखशिंपले आपल्याला मिळतात, प्रत्येकाची वेगळी ठेवण, वेगळे रंग, वेगळी वैशिष्ट्य पण सगळेच आपल्या मनाला भावतात. तशा तुझ्या सर्व कविता आहेत असं मला वाटतं.. आणि या सर्व कवितांनी मिळून तुझा छानसा झुंबर तयार झाला आहे.💫
  तुझ्या कापूरवेल या कवितेत तुझी कविता कशी असावी याबद्दल लिहिलं आहेस.. अगदी तंतोतंत तसंच होतं तुझ्या या सगळ्या कविता वाचल्यानंतर, अंगी भिनतात असं म्हणायला काही हरकत नाही..
  तुझ्या या यशस्वी पुस्तकाबद्दल मनापासून अभिनंदन आणि असा हा इतका सुंदर खजिना आम्हा वाचकांना दिल्याबद्दल आभार.😊🙏🏻

 • माझ्या हाती पुस्तक पडलं अन मला जो आनंद झाला तो अवर्णनीय होता🥳. अगदी नावाप्रमाणेच हे काजव्यांचे झुंबर अनुभवताना देखील तेजोमय भासत. ☺️कविता संग्रहास एकाच भावनेची पार्श्वभूमी असावीच अस काही नाही आणि याच सुंदर उदाहरण म्हणजे अक्षय दादाचे हे झुंबर🙌 प्रत्येक कविता वाचताना तोंडून वाह वाह चे उदगार आल्यावाचून राहत नाही.👌देव वेशीवर टांगलाय, मोठी झालीस, पाऊस या व अश्या बऱ्याच कविता मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत💗पुस्तकाच्या शेवटास वाटत होतं याची पान वाढत जावो संपूच नये💯🍀..खूप छान.👍 वेळात वेळ काढून पुस्तक पोहचवल्याबद्दल खूप सारे आभार. तुझे हे काजव्यांचे झुंबर नेहमी अक्षय राहो, अगदी तुझ्या नावाप्रमाणे. तुझे करावे इतके कौतुक कमी आहे. आम्हा वाचकांना दिलेल्या या सुंदर भेटीसाठी आभार. तुझ्या पुढच्या प्रवासास खूप शुभेच्छा💐.अशाच नवनवीन पुस्तकांसहित तू भेटत राहो🙌💗💃🎀🤗🎉

 • अक्षय दादाच्या काजव्यांचं झुंबरने मनाला दिल सुख,😍
  हलके होत गेले लपलेले दुःख,🙂
  त्याच्या कवितेत आहे जणू एक अतरंगी चाल,✨
  त्याच्या शब्दांत आहे एक जादूची ढाल..!💯

  – खरं म्हणजे मी सुद्धा कधी कविता वाचत नव्हतो पण, खरचं ह्या अशा कविता आहे ज्यांना काही विषय नाही पण मनावर खोल रुजणाऱ्या ह्या कविता आहेत. आज अक्षय दादा एक “कवी” म्हणून आपल्या भेटीस आला आणि काजव्यांचं झुंबर आपल्या हातात देऊन एक वेगळी वाट निर्माण करून गेलाय. अक्षय दादा बद्दल बोलावं तितकं कमीचं आहे अगदी मोठ्या भावाप्रमाणे मला प्रत्येक वेळी तो मदत करत असतो, आणि योग्य मार्ग दाखवण्यात तो नेहमी अग्रेसर असतो…
  आता वाट बघू नका प्रत्येकाने आजचं आपली “काजव्यांचं झुंबर” प्रत ऑर्डर करा…
  अगदी मनापासून पुढीस वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐📚📚…

 • 🌟”काजव्यांच झुंबर”🌟
  अप्रतिम शब्दरचना अक्षय 👍 अगदीच मनाला भिडणारी🤗
  मी excited तर होतेच वाचण्यास की नक्की काय असेल ह्यात, ह्याच्याशी जमेल की नाही आपलं कळणार की नाही, खूप प्रश्न होते पण तेवढीच उत्सुकता सुद्धा वाचण्याची😊
  आणि Finally आमची भेट झाली।।🤗
  “काजव्यांच झुंबर” घरी आणताच आणि कविता संग्रह बघताच आईला झालेला आनंद आणि त्याक्षणी तिला आठवलेले काही गोड क्षण आजोबांच्या कविता❤
  खरच ह्या आनंदमय क्षणासाठी तुझे मनापासून आभार 🙏💛
  प्रत्येक कवितेत काहीतरी वेगळं,नवीन भाव,आठवण आणि आपलेपणा✨
  खूप खूप म्हणजे खूप आवडल्यात तुझ्या कविता🤩
  अव्यक्त ,पाऊस ,मनोरंजन ,आजोबांचे व्याकरण ,माझा मी,राधा,विश्राम,अशी तू,मित्र,बाबा,चूक
  ह्या अगदी जवळच्या आणि जुनं नातं असल्यासारखं वाटतं💖
  वाचलं तर वाचतच राहु वाटतं,
  कविता ही गोड आणि त्यामधले शब्द ही गोड,
  तु कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेले भाव आणि शब्दरचना त्याहुन गोड,
  खूपच सुंदर❣️
  शब्दात तुझ्या हरवून गेले, जणू कवितेत गुंतून गेले
  काजव्यांसारखा व्यक्त तु झालास आणि झुंबराच्या त्या लख्ख प्रकाशाने जग बदलून माझे गेले ✨🌟
  कविता सूचणे हे खरंच भाग्यशाली असण्याचे लक्षण आहेत..
  आणि अप्रतिम, गोड अश्या कविता काजव्यां मार्फत आमच्या पर्यंत पोहोचवल्यास हे आमचे भाग्य आहे😇
  अश्याच उत्तमोत्तम कविता तुझ्याकडून होवोत
  आणि त्या निमित्ताने आम्हा वाचकांची आणि तुझ्या कविता संग्रहाची भेट होत राहो🤘💛
  पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा😍
  आणि मन:पूर्वक अभिनंदन 🤗😊
  Proud of u Akshay…शब्दांचा खेळ, मांडणी आणि कवितेतून तुझं व्यक्त होणं, खरच तू खूप Great आहेस☺

 • मनापासून लिहिलेली प्रत्येकच कविता ही अप्रतिम असते… शब्दातीत असते. लोकांसाठी, मानधनासाठी किंवा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लिहिलेल्या या शब्दारूपी काजव्यांच्या झुंबराने काळजात अगदी खोलवर प्रकाश पाडला. पुढल्या पुस्तकाची आतुरतेने वाट. खूप शुभेच्छा…!!!

 • काजव्यांचं झुंबर हे तुझं कवितांचे पुस्तक माझ्या हाती आलं ते अगदी रक्षाबंधनच्या दिवशी आणि मला खरंच खूप आनंद झाला . म्हणजे मी तुला दादा बोलते आणि पुस्तक मला मिळालं तेही अगदी रक्षाबंधनच्या दिवशी .😊 पुस्तकातील सगळ्या कविता खूप छान आहेत. तुझ्या कविता अगदी मनावर खोल रुजणार्‍या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्याशी रिलेट करतात असं मी म्हणेन. पाऊस ,ओंजळ, देव वेशीवर टांगलाय ,चूक, राधा ,राम राम ,कापुराचे हसू ,कापूर वेल अगदी सगळ्यात कविता आवडल्या .
  तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा.

 • प्रत्येक मनात एक काजवा लुकलुकत असतोच..

  आज पुस्तक पूर्ण वाचून झाले..
  अप्रतिमच..💫

  पुस्तकातील प्रत्येक कविता अनुभवताना मन अगदी पूर्णपणे बालपणात जात. काही कविता मनाला प्रसन्नता, देतात तर काही मनातील भावना जागृत करतात.एक क्षण अस वाटतं की बालपण पुन्हा नव्याने अवतरतलं आहे..

  खरंच खूप छान आहे ते सगळ वास्तविक आणि काल्पनिक मांडलेलं जग..

  अस बोलतात पुस्तक माणसाला घडवतं.. पण थोडं यापुढे जाऊन सांगेल पुस्तक माणसाला जोडत पण..

  उदाहरण द्यायचं झालं तर तुझी माझी नवी मैत्री..💞

  असो.. खरंच खुप छान लिहीलं आहेस.. पहिल्याच प्रयत्नात अस काही विलक्षण लेखन करून मन जिंकलीस..

  पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!

  असंच नव नवीन तुझ्याकडून घडतं राहो आणि ते आमच्यापर्यंत पोहचत राहो!

  आणि आता पुढील नव्या गोष्टीची उत्सुकता राहील..💫

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *