Musafir - मुसाफिर

मुसाफिर

पोस्ट शेयर करा:

लेखक – अच्युत गोडबोले

पृष्ठसंख्या – ३७५

प्रकाशन – मनोविकास प्रकाशन

मुल्यांकन – ४.७ | ५

धगधगत्या सूर्याने प्रकाश मिळतोच पण त्याच्या तेजाने अनेकांना त्रासही होतो… प्रकाश देण्यासाठी सूर्यच व्हावं असं जरूरी नाही… असच एक व्यक्तिमत्त्व ज्याने अगदी मवाळ पणती होऊन सर्वांना प्रकाश दिला… ज्योतीने ज्योत प्रज्वलित करत प्रकाश सर्वदूर पसरवला… आणि कोणत्याही जवळच्या व्यक्तीला त्याचा त्रासही झाला नाही. ती पणती म्हणजे अच्युत गोडबोले.

सोलापूरच्या एका छोट्याश्या गावात जन्मलेल्या या अवलियाची कहाणी म्हणजे मुसाफिर. हे पुस्तक वाचून माणूस जिद्दीने पेटला नाही तर नवलच. आयुष्यात आलेल्या सगळ्याच चांगल्या वाईट घटनांना उजाळा देत हे पुस्तक त्यांची एक जिद्दी, लढाऊ आणि शिकाऊ मनोवृत्तीची पोचपावती देते. लहानशा गावात वाढताना झालेले संस्कार, शिक्षणाचे विलक्षण वेड, स्वतःच्या अस्तित्वाची धडपड तसेच समाजाशी जोडली गेलेली एक नाळ… त्यातून प्रत्येक कलेविषयी, भाषेविषयी, संगीता विषयीचा आदर व भान त्यांना सगळ्यांपासून वेगळं बनवत. श्रीमंत बनवत व एक अवलिया कलाकाराची मोहर त्यांच्यावर आपोआपच उमटते. पुस्तकांप्रति प्रेम तसेच जीवनावर आणि मानवतेवर प्रेम त्यांची कहाणी अजुनच सुरेख बनवते.

या पुस्तकात तुम्हाला जगण्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन पाहायला मिळेल, पुलंनी म्हतल्याप्रमाने “प्रेमात पाप नाही” याची अनुभूती येईल. आणि सर्व क्षेत्रातील त्यांचे योगदान, त्यांचे काम समजून घेताना तुम्हाला भरून पावेल. त्यांची ती अक्षय विविधता ( infinite variety ) तुम्हाला नक्कीच प्रसन्न करेल त्याच साैंदर्य नक्कीच भुलवत ठेवेल. आणि त्यांचं चिरतरुण साैंदर्य त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला भेटेल, बिलगेल आणि सुखाची एक लाट समजाच्या उत्कटतेचा तिढा घेऊन पुढ्यात येईल. आव्हांनाचे असे सुगंधी अत्तर लावून जगलेल्या माणसाने काही क्षण आपल्याला या पुसतकाद्वारे दिले आणि तेही मराठी भाषेतून, हे आपल्या मराठी जनतेचे भाग्यच म्हणायला हवे.

अच्युत गोडबोले यांबद्दल बोलावे तितके कमीच… आणि यातच त्यांनी ऑटीझम असलेल्या अनेक मुलांसाठी केले काम आपण विसरू शकत नाही. त्यांनी त्यांचा संपूर्ण जीवनपट या पुस्तकात मांडला आहे… आणि तो त्याहूनही कितीतरी मोठा आहे हे तुम्हाला जाणवेलच. “तो जगदात्मा दशांगुळे उरला” त्याचप्रमाणे त्यांचं आयुष्य आपल्याला आजूनही नीट समजलेलं नाही असं सतत वाटतं राहतं. त्यांच्या या कामाबद्दल आपण फक्त त्यांचे आभार मानू शकतो आणि असेच अधिकाधिक अनुभव त्यांकडून मिळावेत अशी आशा बाळगू शकतो. त्यांच्या या पुस्तकाचे माझ्या मनातले स्थान नक्कीच खूप मोठे आहे. आणि तुमच्याही मनात ते नक्कीच घर करून राहील याची शाश्वती देतो.

musafir achyut godbole manovikas charitra biography akshay gudhate


अमॅझॉनवरून विकत घ्या


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/470/musafir—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




संबंधित व्हिडिओ



पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

2 Comments

  • “आयुष्याचा अर्थ कळतो मागे वळून पाहताना आणि ते जगावं मात्र लागतं ते पुढं बघून….!” हे वाक्य लक्षात ठेवून त्यांनी आपलं आयुष्य सगळ्यांसमोर सोप्या शब्दांतुन मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या आत्मचरित्रातून केला आहे. त्यांची ‘संगणकयुग’, ‘बोर्डरूम’, ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘गुलाम’, ‘कॅनव्हास’, ‘मनात’ असे कित्येक पुस्तकं वाचकांच्या मनात घरं करून गेली आणि या सगळ्यांची यशस्वी बांधणी करताना वेळोवेळी त्यांच आयुष्य त्यांना मार्गदर्शन करत आलं.

    अच्युत गोडबोले यांचा जन्म सोलापूर इथे झाला आणि एकत्रित कुटुंबात वाढल्यामुळे त्यांच बालपणही खूप रंजक असं होतं. त्यांच्या सर्व भावंडानी आपापल्या क्षेत्रांत चांगली प्रतिष्ठा मिळवली होती. मग लहानपणी इलेक्टरीशीयणने लावलेला उलटा पंखा, एकेदिवशी काकांचा शर्ट घालून आलेला धोबी, परीक्षा संपल्यावर वर्षातून गदग रेस्टॉरंट मध्ये खायला मिळणारा डोसा, सुट्टीत पुण्यात जायला मिळणारा याचा आनंद अशा खूप मजेशीर गोष्टी त्यांनी अनुभवल्या होत्या. त्यांचे वडीलही खुप हूशार व्यक्तीमत्व असल्यामुळे ते खूप गोष्टी त्यांना सांगत असत. मग सोलापूरातील भुईकोट किल्ला, हुतात्मा चौक, मोतीबागेतला कबर तलाव, पाच्छा पेठ, मग तिथली वेगवेगळ्या सिनेमाची थिएटर्स, त्यात हैदराबादी आणि हिंदी एकत्रित बोलून लावलेली वाट आणि प्रत्येक गोष्टीची एक कथा खूप मजेशीर सांगितली आहे. मग पुढे आयुष्यात आलेले पुजारी नावाचे सर ,बोर्डात येणं ह्या खूप सुखदायक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या. गणितात खूप गुण मिळत असले तरी हिंदीमध्ये मात्र त्यांची बोंबच होती.

    पुढे IIT ची प्रवेश परीक्षा पास करून मिळालेला प्रवेश, जणू एका जगातून दुसऱ्या जगात मिळालेला प्रवेशच होता. मग तिथं शिकणं, होस्टेलवर होणाऱ्या गमतीजमती, विविध पुस्तकांवर, साहित्यावर, संगीतावर होणारी चर्चा यामध्ये अनेक रात्री खर्च केल्या होत्या. मग त्यातुन निर्माण होणारा रस अचंबित करून टाकायचा. असच एकदा एक राग ऐकायचा म्हूणन भर पावसात प्रवास करून पहाटे ३ वाजता मामाच्या घरावर थाप मारणं आणि तरीही ती कॅसेट नाही मिळाली म्हणून बाजारातून आणून ऐकण हे खरच अविस्मकारक होत. एखाद साहित्य जाणून घेण्यासाठी भरपुर पुस्तके वाचून त्यातून इतिहासाचा अमर्याद शोधचं त्यांना लागत होता. गरीबी आणि श्रीमंती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आजीवन त्यांच्यासाठी काम करण्याचा वडिलांना सांगितलेला निर्णय. मग शहाद्याच्या चळवळीत सामिल होणं तसेच चळवळीतून जेलमध्ये जाणं. मग त्या दहा दिवसांत तिथे आलेले विदारक अनुभव हे खूप काही शिकवून गेले. हे सगळं सोडून मुबंईला परतायचं ठरवलं. तिथे धारावी झोपडपट्टीतील जीवन पाहून, कामाठीपुरातील वेश्याच्या कहाण्या ऐकुन मन हेलावून जात असे.

    आता आपण आयुष्यात काहितरी करायला पाहिजे असा येणारा विचार. मग पहीली नोकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड त्यात प्रोग्राम शिकण्याची ऊर्मी बघून खूप अवाक झाल्यासारखं होत. आयुष्यात आलेली त्यांची पत्नी शोभा, त्यांच्या मुलाला झालेला ऑटिझम हा आजार त्यातून मग अशा मुलांसाठी केलेली संस्था त्यासाठी कॉम्प्युटर जगात घेतलेले परिश्रम खूप काही देऊन जातं. इतरांना या गोष्टी लवकर आणि सोप्या भाषेत कसं समजेल यासाठी ‘Operating System’ हे लिहलेल पुस्तक त्याचा होणार खप एक आत्मविश्वास त्यांना देत होता.

    जगमगत्या जगात मोठया पदावर L&T, PATNI, INFOTECH अशा कंपनीत काम करूनही ह्या माणसाचे पाय जमिनीवरच होते. मग त्यांचं मन रमत नसल्यामुळे त्यांनी हे जगमगत्या जागातून पायउतार होण्याचं ठरवलं. पुन्हा त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्यांने पुस्तक लिहण्याचं ठरवलं त्यातही ते कमालीचे यशस्वी झाले. या पुस्तकातील प्रत्येक प्रसंग खात्रीपूर्वक आपल्याला उभारी देण्याचं काम चोखपणे करतो म्हणुन पुस्तक खरंच वाचावचं असं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *