लेखक – जॉर्ज क्लेसन
अनुवाद – कमलेश सोमण
पृष्ठसंख्या – १४४
प्रकाशन – गोयल प्रकाशन
मुल्यांकन – ३.८ | ५
मेसोपोटेमियन कालीन जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून नावारूपास आलेलं बॅबिलॉन शहर. त्या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा श्रीमंत झाला याबद्दल हे पुस्तक. जॉर्ज क्लेसन यांनी हे पुस्तक १९२६ साली लिहिलं आणि आजही ते असंख्य लोकांना संपत्ती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतंय. जवळपास १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पुस्तक आजच्या युगात कसं उपयुक्त ठरेल या विचारात जर तुम्ही असाल तर हा विचार नक्कीच चुकीचा ठरेल.
बंसिर हा एक रथकारागीर आहे आणि त्याला त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. कॉब्बी आणि बंसिर दोघे मित्र बॅबिलॉन मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्कद कडून श्रीमंत होण्याचा मार्ग जाणून घ्यायचं ठरवतात आणि अर्कद त्यांना ते सांगतो. श्रीमंत होण्याचं गुपित काय आहे आणि ते खरंच योग्य आहे का याच उत्तर तुम्हाला पुस्तक वाचताना मिळेल.
संपत्ती निर्माण कशी करायची या बद्दल पश्चिमेकडे बरच लिखाण झालं आहे. त्यातील सर्व सामान्यांना सहज समजेल अश्या पद्धतीने संपत्तीचा मार्ग या पुस्तकात दिला आहे. अगदी सुरुवातीच्या ३ प्रकरणांतून तुम्हाला तो मार्ग समजेल. विचार करा आणि श्रीमंत व्हा या पुस्तकांपेक्षा जास्त प्रॅक्टिकल मार्ग या पुस्तकात आहे. जर तुम्ही रातोरात श्रीमंत होण्याचा मार्ग शोधत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही (अर्थात कोणतंच पुस्तक तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत बनवणार नाही). पुस्तकाचा अनुवाद वाचनीय आहे. आर्थिक शिक्षणासाठी तुम्ही मुलांनासुद्धा हे पुस्तक नक्कीच वाचायला द्यायला हवं.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: