uchlya marathi book review

उचल्या

पोस्ट शेयर करा:

लेखक – लक्ष्मण गायकवाड

पृष्ठसंख्या – २६३

प्रकाशन – श्री विद्या प्रकाशन

मुल्यांकन – ४.१ | ५

महाराष्ट्रात अनेक भटक्या आणि विमुक्त जाती जमाती आहेत. त्याच्यातच वाढलेल्या, शिक्षणाने त्याहून वेगळा आणि हळू हळू परिस्थिती सुधारून आपल्या आत्मरित्रातून विमुक्त भटक्या समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम लक्ष्मण गायकवाड यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आणि तेही तेवढेच प्रभावित करतात. अनेकांनी याची तुलना “उपरा” शी केली आहे. हो पण इतकेच सगळ नाही, या पुस्तकावर अनेकांनी टीकाही केली आहे. अनेकांच्या मते यात काही गोष्टी उगीच लिहल्या आहेत.

 हे पुस्तक काही बाबतीत अनेक समस्यांची उजळणीच म्हणावी लागेल, ज्या आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात सहसा येत नाहीत. पुस्तकाचा सुरवातीचा काही भाग खूपच आश्चर्यजनक गोष्टींचा उलगडा करतो पण शेवटचा भाग अनिगडीत, असंबंधित पात्रांनी थोडासा निरस वाटू शकतो. लेखकाचा जीवनपट कुरूप अक्षरांचा असला तरी त्यातला गाभा शोधणं इथे महत्वाचं ठरत.

खेड्यापाड्यातील राहणीमान, तिथले वातावरण, त्यातील बरेच बारकावे पुस्तकातून वाचायला मिळतील. लहानपणापासून आपण ऐकत असलेले हे संस्कार, कसे अनेकांना मिळतच नाहीत आणि मिळाले तरी त्यांना त्यानुसार वागणूक मिळत नाही याचं ज्वलंत उदाहरण या पुस्तकात लेखकाने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेने देतो. लेखकाच्या शाळेत काही मुलांना खरूज होते व त्याच कारण म्हणून या विमुक्त भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून परावृत्त करण्याचा निर्णय गावची पंचायत घेते, तेंव्हा आजपर्यंत आपल्या आसपास असे अनेक प्रकार घडत असतील आणि आपण त्यात काहीही करत नाही या जाणिवेने मन उद्विग्न होते.

काही अंशाने हे पुस्तक आरसा आहे, त्या परिस्थितीत त्या कालखंडात अनेक भटक्या जमातींत वाढलेल्या लोकांच्या मनाचा, भावनांचा. त्यात दिसणारे दृश्य भयानक आहे आणि त्यातून लेखकाने  स्वतःच पाहिलेलं प्रतिबिंब हा एक लेखनाचा उत्कृष्ट नमूना म्हणायला हवा. हे पुस्तक तुम्हाला नकळत बरेच काही देऊन जाते. वाचून पहा.

uchalya laxman gaikwad, shri vidya akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/7037/uchalya—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]



संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *