लेखक – श्रीमती रमाबाई रानडे
पृष्ठसंख्या – २७२
प्रकाशन – वरदा प्रकाशन
मुल्यांकन – ४.४ | ५
१९ व्या शतकात भारतात होऊन गेलेल्या काही अतिशय महत्वाच्या आणि असामान्य स्त्रियांच्या यादीत श्रीमती रमाबाई रानडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. भारतात स्त्रीशिक्षण हा जेंव्हा गुन्हा मानला जात असे त्या काळातील हे पुस्तक आहे, आणि त्याच काळातील काही आठवणींनी अंमळ भरलेले हे पुस्तक एका स्त्री चा गौरव आहे तिच्या प्रगतीची वाटचाल असलेला एक अंक आहे. उंच माझा झोका या मालिकेने मराठी माणसांच्या घराघरांत पोहचलेल्या रमाबाई खऱ्या अर्थाने कशा होत्या, त्यांची शैक्षणिक वाटचाल कशी सुरू झाली याची इत्यंभूत माहिती यात आहे.
न्यायमूर्ती महादेव रानडे हे त्या कालखंडातील अनेक समाजकल्याण पर चळवळींचे जनक. त्यासोबतच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातही त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. आणि याच त्यांच्या कर्मठ आणि सशक्त विचारांच्या आधारे त्यांनी स्त्री सबलीकरण यासाठी अत्यावश्यक असलेल्या शिक्षणावर स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या पत्नीपासून सुरावात केली. लेखिकेने आपल्या आत्मचरित्रात कौटुंबिक वातावरण, सामजिक घटना आणि आपल्या पतीशी असलेल्या आगळ्या वेगळ्या नात्यावर आणि अनेक आठवणींवर भाष्य केलं आहे.
यात रमाबाई लहानपणी कशा अल्लड होत्या मात्र हळू हळू त्यांच्यातील झालेला सुप्त बदल त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची एक नाजूक व सुंदर कहाणी आहे. त्याचसोबत आपल्याला न्यायमूर्तींच्या देखील अनेक गुणांचे, स्वभावाचे, वागणुकीचे आणि कर्तृत्वाचे बारकावे यातून स्पष्ट दिसून येतात. एका असामान्य स्त्रीची मातब्बरी आणि कर्तृत्ववान नायकाची ही कहाणी वाचली की नक्कीच आयुष्याला स्फुरण चढते. नक्की वाचावे असे पुस्तक.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: