children of blood and bone book review in marathi

चिल्ड्रन ऑफ ब्लड अँड बोन्स

पोस्ट शेयर करा:

लेखिका – टोमी अडेयेमी

पृष्ठसंख्या – ५४४

मूल्यांकन – ४.७ | ५

६ मार्च २०१८ रोजी टोमी अडेयेमी यांचं चिल्ड्रन ऑफ ब्लड अँड बोन्स  हे पुस्तक प्रकाशित झाले आणि पुस्तक जगतात एकच खळबळ उडाली. अगदी हॉलीवुड मधल्या नावाजलेल्या दिगदर्शकांनी या पुस्तकाची दखल घ्यावी यातूनच आपल्याला या पुस्तकाच्या लौकीकाची कल्पना येते.

 या पुस्तकात टोमी यांनी ओरीशा नावाच्या जादुई देशाची कहानी मांडली आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कथा एखाद्या निखळ झऱ्यानी वळण घेत वहाव तशी वाटते. ओरिशा मधील दोन प्रमुख गट माजी आणि कोसीदान यांच्यातील संघर्ष लेखिकेने खूप प्रखरतेने रंगवला आहे. कथेतील सर्व मुख्य पात्रे झीली, इनान, आमारी आणि झेन यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. माजी आणि कोसी दान यांच्यातील संघर्षाचे कारण नक्की आहे तरी काय? झीली या किशोरवयीन मुलीची यात इतकी महत्त्वाची भूमिका का असावी? आपल्या पूर्वजांच्या लयाला गेलेल्या जादूचे पुनरुज्जीवन झीली कशा प्रकारे करते? हे वाचताना अंगावर काटा येतो. ओरिसाची जादुई दुनिया बरोबर वंशभेद ,राजनीति ,जातिवाद या सगळ्याच गोष्टी लेखिकेने एकाच धाग्यात गुंफण्याची किमया केली आहे.

सुरुवातीला  लाजरीबुजरी वाटणारी अमारी आणि तिचा जीवन प्रवास वाचताना गेम ऑफ थ्रोन्स मधली  सांजा स्टार्क हटकून आठवते. त्याचप्रमाणे आपले कर्तव्य आणि आपले प्रेम यांच्यामध्ये संभ्रमात पडलेला ईनान आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातो. आणि हो…  हे पुस्तक वाचताना ब्लॅक पँथर, गेम ऑफ थ्रोन्स , हॅरी पॉटर मनात डोकावतात.

टोनी मॉरिसन, एलिस वॉकर , हार्पर ली या सगळ्या ज्येष्ठ साहि्यिकांकडून आपापल्या लिखाणातून वंशभेदावर चांगलेच आसूड ओढले गेले आहेत.या सर्वांच्या पंक्तीत आता चोवीस वर्षीय टोमी यांचे चे नाव घेतले जावे हीच प्रेरणादायी गोष्ट आहे. मुर्तीमंत  प्रतिभेने त्यांनी या पुस्तकाला एका अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवल आहे.

त्यामुळे तुम्ही अगदी ढिगांनी पुस्तकं वाचली असली तरीही ही तुम्हाला या पुस्तकासाठी मनाचा एक तरी कोपरा रिकामा ठेवावाच लागेल. इतक्या लहान वयात प्रतिभासंपन्न टोमी ने उभं केलेलं ओरीशा च कल्पनाविश्व तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणूनच नक्की वाचा… चिल्ड्रन ऑफ ब्लड अँड बोन्स.

tomi adeyemmi renuka salve childrens blood bone macmillan


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

रेणुका साळवे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *