लेखक – दिलीप प्रभावळकर
पृष्ठसंख्या – १६३
प्रकाशन – उत्कर्ष प्रकाशन
मूल्यांकन – ४.६ | ५
२००५ साली हे पुस्तक माझ्या ताई ने विकत घेतलं. ह्या पुस्तकावर आधारित एक मालिका २००१-२००३ मध्ये होऊन गेली आणि म्हणूनच हे पुस्तक तिने आणले होते. मी त्यानंतर २-३ वर्षांनी हे पुस्तक सहज म्हणून वाचायला घेतलं आणि एका दिवसातच वाचून काढलं. अत्यंत साधी सोप्पी भाषा असलेला हे पुस्तक अर्धवट वाचून ठेवणं अशक्य आहे. स्वतः दिलीप प्रभावळकर त्या मालिकेत काम करीत असल्याने व त्यांनीच हे पुस्तक लिहल्यामुळे खूप गोष्टी खऱ्या आणि सोप्प्या वाटतात. शिवाय मालिका होऊन गेल्यानंतर हे पुस्तक आल्याने आपल्या डोळ्यासमोर त्यांचं घर , राहणीमान , पोषाख अगदी हुबेहूब उभे राहतात.
हे पुस्तक लिहताना त्यांनी अनुदिनी म्हणजेच डायरी ची संकल्पना घेतलीये. मालिका आधीच होऊन गेल्याने लेखकाने लिहताना कुठेही शॉर्ट कट मारला नाही उलट सगळ्या व्यक्तिरेखा मालिकेप्रमाणेच घेतल्या आहेत जेणेकरून पुस्तक अधिक आपलंसं वाटेल. कुटुंबातील ५ सदस्य शेखर, शामल, शिऱ्या , शलाका आणि आबा हे लोकं रोज डायरी लिहितात अशीच पुस्तकाची रचना लेखकाने केली आहे. एकच प्रसंग प्रत्येकाच्या डायरी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाचायला मिळणे हे त्यांच्या लेखनाची आणि स्वभावाची कमाल आहे. मध्यम वर्गीय कुटुंबात घडणाऱ्या या सर्व गोष्टी मनाला अगदी आपल्याशा वाटून जातात.
सर्वांनी हे पुस्तक एकदा वाचून बघावं म्हणजे आपोआपच ते तुम्ही पुन्हा पुन्हा वाचाल. आज भाजी कोणती केली आहे पासून ते निवडणुकीच्या गोष्टी असे एक ना अनेक हलके फुलके प्रसंग लेखकाने रेखाटले आहेत. काही काही गोष्टी तर अगदी आपल्याच घरात घडून गेल्यासारख्या वाटतात आणि म्हणूनच की काय हे पुस्तक लक्षात राहतं . डायरी लिहण्याचा क्रम कसाही असला तरी म्हणजे आधी शेखर, मग शलाका, मग शामल असा कोणताही एक ठरलेला क्रम नाहीये म्हणून पुस्तक वाचताना ते जास्त सहज वाटतं . २-३ दिवसांची डायरी वाचली कि प्रत्येकाची लिहण्याची पद्धत आपल्याला कळून येते व आपण देखील पुढे तसंच अनुमान करायला लागतो कि “अमुक एखाद्या” प्रसंगावर कोणी कसे या काय लिहले असेल. तसेच ३ पिढ्या घरात वावरत असल्याने तरुण, मध्यम आणि प्रौढ व्यक्ती हे पुस्तक सहज वाचू शकतात .
ह्या पुस्तकाची अजून एक गम्मत म्हणजे डायरी मध्ये आपण नेहेमी गुपितं लिहतो म्हणूनच वाचकाला सर्वांची गुपितं आपोआप समजत जातात आणि आपण ते लक्षात ठेऊनच बाकी पुस्तक वाचतो . त्यांना एकेमेकांबद्दल वाटणारी ओढ , प्रेम , कधीतरी आलेला राग हे सगळं आपल्याला अगदी आपल्याच घरातलं वाटू लागतं .
माणूस प्रत्येक वयोगटात , विविध प्रसंगात कसा वागतो ? आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या असतात? एक गृहिणी, एक नोकरी करणारा कर्ता पुरुष, एक ८० वर्षाचे आजोबा, एक २० वर्षाची धाकटी लेक आणि एक २५ वर्षाचा घरातला मोठा लेक ह्यांचे आयुष्याकडे बघण्याचे दृष्टिकोन जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक एकदा नक्की वाचावं .
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ
I had watched the series, a few years ago and was intrigued to read the book. I recently read this book and it is wonderfully written. It is a quick read. While reading, one can actually feel being a part of the family and experiencing the situations. As the review above, I totally agree with the fact that every occurrence is expressed so well from every individual’s point of you and in a very simplistic way.