evalya evalya goshti marathi book review cover

इवल्या इवल्या गोष्टी

पोस्ट शेयर करा:

लेखिका – उत्कर्षा बिर्जे

समीक्षण –  स्मिता देशपांडे

पृष्ठसंख्या – २८०

प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन

मूल्यांकन – ३.८ | ५

महाराष्ट्रातील प्रसिध्द वर्तमानपत्र लोकसत्ताची महिला पुरवणी ‘चतुरा’ अतिशय दर्जेदार आणि वेगळ्या चौकटीत आखणी केलेली पुरवणी. या पुरवणीमधे एक सदर यायचे ‘वळणवाटा’. सदर पुस्तक हे लेखिकेने या सदरात लिहिलेल्या  ललितलेख (गोष्टींचे) संकलन आहे.लेखिका व्यवसायाने डाँक्टर होत्या तरीही व्यवसायाच्या पलिकडे जाऊन एक संवेदनशील मन त्यांच्याकडे होते आणि म्हणूनच घटना, प्रसंग, अनुभव, आठवणी, किस्से, नोंदी यांचा एक खजिना त्यांच्याकडे होता ज्यामधून त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक तसेच हळूवारही जाणवतो. लेखिकेने कवितांवरही तेवढेच अतोनात प्रेम केले होते. डाँ उत्कर्षा यांचे नाव प्रथितयश लेखकांच्या यादीमधे निश्चितच येते. 

दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्याच संबंधित या लेख या पुस्तकात आहेत. प्रत्येक वेळेस वाचले की अरे हे तर आपल्याच मनातले, असे नेहमी वाटुन जाते. गुढीची काठी, श्रावण रंगपंचमी, ऊन, पाऊस, काँलेज आणि हॉस्टेल लाईफ, आरसा, कामगार, पुस्तक, वाचन असे छोटे छोटे पण आपल्याच जिव्हाळ्याचे विषय या लेखांमधून साकारले आहेत व्यक्त झाले आहेत आणि म्हणूनच हे आपलेच पुस्तक आहे ही जाणीव हे पुस्तक वाचताना सतत होते.

खरंतर जेव्हा आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना लिहल्या जातात तेव्हा त्यात स्व हा येतोच पण लेखिकेने तिचा स्व मात्र या लेखातून थोडा लांबच ठेवला आहे आणि मला वाटतं हेच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. किंबहुना म्हणूनच सगळं तुमच्या आमच्या आयुष्यातीलच वाटावे इतके हे लिखाण आपलेसे वाटणारे लिखाण आहे.

 लेखिका व्यवसायाने डॉक्टर होत्या रोज वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटत तसेच अनेक चांगल्या वाईट घटना प्रसंगाना सामोऱ्या जात असत. यामधून त्यांच्या संवेदनशील मनाला जाणवलेले सगळे पुस्तकातील गोष्टीत उतरले आहे. त्याच बरोबर लेखिकेचे बालपण कोकणात गेलेले घरातील सर्व रूढी परंपरा सणवार यांच्या मधे पण त्या रमत ते ही प्रसंग इवल्या इवल्या गोष्टीत आलेले आहेत. या पुस्तकात एकूण ५९ गोष्टीं दोन विभागात दिल्या आहेत. खरं पाहता कोणतेही पान उघडावे आणि वाचायला सुरूवात करावी असे हे पुस्तक. एकदा नाही दहा वेळा वाचले तरी प्रत्येक वेळेस नवीन अर्थाने कळणारे हे पुस्तक आहे आणि आपल्या संग्रहात ठेवावे असेच निश्चितच आहे. 

डॉ उत्कर्षा यांचे वळणदार अक्षर यावरून या सदराचे शिर्षक ‘वळणवाटा’ ठरवले गेले होते. मात्र चतुरा पुरवणीतील वळणवाटा लिहिता लिहिता लेखिका मात्र फार लांबच्या वाटेवर निघून गेली.

समीक्षण –  स्मिता देशपांडे

evalya goshti smita deshpande utkarsha birje granthali


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/10431/evalya-evalya-goshti-dr-utkarsha-birje-granthali-prakashan-buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *