mother book review in marathi cover

आई (मदर)

पोस्ट शेयर करा:

लेखक – मॅक्झिम गॉर्की

पृष्ठसंख्या –  ४४०

मूल्यांकन – ४.५ | ५

अधुनिक जगाच्या इतिहासला आकार देणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे रशियन क्रांती. या एका घटनेमुळे जगातील कैक देश परक्यांनी आपल्या मानेवर ठेवलेल्या गुलामगिरीला, झटकून फेकून देण्याची स्वप्ने रंगवू लागले होते. रशियन क्रांती घडवून आणण्यामागे तेथील कामगारांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्या काळातील कामगार वर्गाची व्यथा आणि कथा आपल्याला वाचायला मिळते, मॅक्झिम गॉर्की यांच्या “मदर”या पुस्तकात.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टीशी खूप जवळचे संबंध असणारे मार्क्‍सवादी गॉर्की यांनी या पुस्तकात कामगारांचे जीवन आणि त्यातील संघर्ष खूप आत्मीयतेने मांडला आहे. या कथेचा नायक पावेल आणि मॅक्झिम गॉर्की यांच्या जीवनात फारच साम्य आहे. स्वतः तेच जीवन जगलेले गॉर्की यांचा शुल्लक कामे करणारा लहान मुलगा, ते लिओ टॉलस्टॉय यांच्या तोलामोलाचा लेखक इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या लेखनाने रशियन साहित्याला एक वेगळीच दिशा दिली. त्यात टर्निंग पॉइंट ठरली आई ही कादंबरी. मूळ रशियन भाषेमध्ये लिहिलेली ही कादंबरी जगातील कित्येक भाषांमध्ये अनुवादित केली गेलेली आहे.

या कथेमध्ये मॅक्झिम गॉर्की रशियन इतिहासाला एका आईच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतात. आपल्याकडे आईच काळीज सर्वात हळवं मानलं जातं, पण कथेतील आई, पेलाजिया नीलोवना या विचारांना चांगलीच चपराक लगावते. एकाच कथेला दोन अनुषंगाने मांडणे, ही लेखकाची शैली तुम्हाला थक्क करेल. दिवसभर घरासाठी राबणारी, संध्याकाळी नवऱ्याच्या अमानुष मारहाणीचा सोसत जगत असते,  इतक्यात कथा एक विस्मयकारक वळण घेते, आणि आपण कथेच्या दुसऱ्या भागात जाऊन पोहोचतो.

इथे पिलाजीचा किशोरवयीन मुलगा पावेल, जेव्हा एका फॅक्टरीमध्ये काम करू लागतो, तेंव्हा खरी कथा उलगडते. काम करताना त्याला कामगारांची पिळवणूक आणि हालाखीचे दाहक सत्य समजते.‌ अनेकांच्या पायाखाली चिरडून जाणाऱ्या कामगार वर्गाचे हाल त्याला असह्य होतात, आणि इथे सुरुवात होते एका क्रांतीची. झारच्या अन्यायी राजवटीला उलथवून टाकण्याचे सामर्थ्य फक्त कामगारांत आहे याची जाणीव होते. आपल्या मुलाने जे काही केले आहे ते योग्य की अयोग्य?? या विचाराने भीतीने काळवंडून जाणारी पेलाजिया पुढे येते. कामगारांच्या वागणुकीतून पेलाजिया समाजवाद शिकते आणि त्यांच्यातील एक होऊन जाते ??

रशियातील सामान्य व्यक्तींच्या जीवनाची कथा ही आपल्याला नकळत जवळची वाटू लागते. आई आणि मुलगा यांच्यातील   

नात्याची भावनिक वीण, तुम्हाला थक्क करेल. या कादंबरीमध्ये मॅक्झिम गॉर्की यांनी रशियन क्रांतीतल स्त्रियांची भूमिका, अगदी प्रखरपणे मांडली आहे. कथेतील पेलाजियाचे पात्र असो वा नताशा, साशा या महिला‌ असोत सर्व व्यक्तिरेखा अतिशय सामर्थ्यवान आणि स्वावलंबी वाटतात. पितृसत्ताक रशियामध्ये स्त्रियांच्या अशा भावना मांडणे म्हणजे शिवधनुष्य. पुढे पावेल ची अटक, स्वतः धाडसाने गुप्तहेर झालेली पेलाजीया कथेला आकार देतात. कथेचा शेवट वाचताना शरीरामध्ये वीरश्री संचारते.

क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा ‌मॅक्झिम गॉर्की यांच्या मदर या पुस्तकाचा उल्लेख अनेकदा केलेला आहे. हे पुस्तक आनेकांची प्रेरणा आहे. जगभरातील महिला क्रांतीचे हे पुस्तक एक उदाहरण आहे, एक प्रियरणा आहे. आवांतर वाचनासाठी हे पुस्तक वाचनीय तर आहेच पण जर तुम्हाला आधुनिक जगाच्या इतिहास सखोल जाणून घ्यायचे असेल आणि तुम्ही जर स्पर्धापरीक्षांची तयारी करत असाल तर हे पुस्तक नक्की वाचाच.

aai mother maxim gorky renuka salve


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

रेणुका साळवे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *