bhartiy udyojika marathi book review cover

भारतीय उद्योजिका

पोस्ट शेयर करा:

लेखिका – सुमन बाजपेयी

अनुवाद – ज्योती नांदेडकर

पृष्ठसंख्या – २६४

प्रकाशन – साकेत प्रकाशन

मुल्यांकन – ४ | ५

आयुष्यातले काही क्षण आपल्याला ‘Reality Check’ देतात आणि तसा माझ्या आयुष्यातला Reality Check देणारा क्षण मला ह्या पुस्तकाने दिला. Reality Check ह्या गोष्टीचा की, ह्या पुस्तकातल्या ३० भारतीय उद्योजिकांपैकी मला जेमतेम ४ उद्योजिका माहित होत्या आणि अर्थातच मी हे पुस्तक वाचण्याची किती नितांत गरज आहे हे मला जाणवलं. असो.

तर मुखपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे ‘कॉर्पोरेट क्षत्रातील ३० सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा ह्या पुस्तकात लेखिका ‘ सुमन वाजपेयी’ ह्यांनी मांडली आहे आणि ह्याचा मराठीत अनुवाद          ‘ज्योती नांदेडकर’ ह्यांनी केला आहे.(मूळ हिंदी पुस्तकाचा हा अनुवाद असावा कारण मूळ कोणत्या भाषेत हे पुस्तक लिहिलं गेेलं आहे ह्याची ह्या पुस्तकात नोंद दिसत नाही).

“जो हासिल है उसे पसंद करो या जो पसंद है उसे हासिल करो”

आणि बाईच्या जातीने जे आहे ते आवडून घ्यावं आणि त्यातच समाधान मानावं ही प्रचंड प्राचीन आणि आजही टिकून असलेली चौकट ह्या पुस्तकातल्या प्रत्येक स्त्रीने (उद्योजिकेने) तोडून ” जो पसंद है उसे हसिल करो” चा प्रवास सुरू केला आणि तो सक्षमपणे पूर्णही केला आणि म्हणूनच ह्या सर्व स्त्रिया ह्या पुस्तकात स्वकर्तृत्वाने आणि मानाने विराजमान आहेत.

माझ्या सारख्या सर्वसामान्यांना माहिती असलेल्या सुधा मूर्ती, एकता कपूर, चंदा कोचर व इंद्रा नुयी ह्यांची माहितीतर ह्या पुस्तकात आहेच पण त्याचबरोबर Utv च्या Chief Creative Officer जरीना मेहता, लिज्जत पापडच्या ज्योती नाईक, जे. पी. मॉर्गन च्या सी ई ओ कल्पना मोरपरिया, VLCC च्या संस्थापिका वंदना लुथरा तर अमुल कंपनीत सर्वोच्च पद भूषविणार्या डॉ. अमृता पटेल आणि अशा विविध कॉर्पोरेट क्षेत्रातल्या उद्योजिकांचा ह्या पुस्तकात समावेश आहे.

कोणत्याच स्त्रीला संघर्ष चुकलेला नाही तसा ह्या उद्योजिकांनाही तो चुकला नाही आणि प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने त्या संघर्षाना तोंडही दिले. पण कल्पना मोरपरिया ह्यांना जेव्हा विचारण्यात आले की “तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र आणि जीवन यामध्ये समतोल कसा साधता? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर माझ्या मनात घर करून गेलं ; त्या म्हणतात ,” माझं कामच माझे जीवन आहे त्यामुळे समतोल साधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”. 

ह्या पुस्तकातील प्रत्येक उद्योजिका एक प्रेरणा स्त्रोत आहे आणि असे ३० प्रेरणा स्त्रोत लेखिकेने आपल्यासमोर ठेवले आहेत आणि अर्थातच अनुवादकाच्या परिश्रमामुळे ते आपल्यापर्यंत आपल्या मायबोलीत पोहचले आहेत आणि विशेष म्हणजे नुकताच ह्या पुस्तकाला  म्हणजेच ह्या पुस्तकाचा अनुवाद ज्यांनी केला आहे त्या ज्योती नांदेडकर ह्यांना पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘कै.सरोजिनी शारंगपाणी’ (उत्कृष्ट स्त्रीवादी वैचारिक साहित्य) हा पुरस्कार देण्यात आला आहे.

तेव्हा ‘एका महिलेने महिलांवर लिहिलेलं आणि एका महीलेनेच अनुवादित केलेले’ हे पुस्तक घेऊन आणि वाचून एका वेगळ्या पद्धतीने स्त्रीत्वाचा सन्मान करूयात..

bhartiy udyojika indian business womans suman bajpayee pranjali kulkarni saket jyoti nandedkar


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/13669/bharatiy-udyojika—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]पोस्ट शेयर करा:

About the author

प्रांजली कुलकर्णी

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *