tuesdays with morrie book review in marathi

ट्यूजडेज विथ मॉरी

पोस्ट शेयर करा:

लेखक – मिच अल्बम

पृष्ठसंख्या – २१८

प्रकाशन – स्पिअर

मुल्यांकन – ४.३ | ५

बाबूमोशाय ”जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए” असं एखाद्या आजारग्रस्त माणसाने सोडाच पण आपल्या सारख्या धडधाकट माणसाने का होईना म्हणायला आणि जगायला हवं अशी बॉलीवूडचा आनंद सिनेमा बघितल्यानंतर आपसूकच आपली सगळ्यांकडून एक अपेक्षा होऊन गेलेली आहे. हे म्हणनं, ऐकणं आणि बघणं जेवढं सोपं आणि छान आहे तितकच प्रत्यक्षात उतरवताना मात्र कठीण काम आहे पण अर्थातच असाध्य नाही. पण तरीही सतत एक प्रश्न आपल्या डोक्यात येत राहतो की, खरंच आनंद बाबूमोशायला म्हणतो तसं ‘लार्जर दॅन लाईफ’ जगू शकत असेल का कोणी?, खरंच स्वतःचं मरण समोर दिसत असतानाही राहू शकत असेल का कोणी आनंदी? आणि एक दिवस अचानक आपल्याला कळतं की दूर कोण्या एका देशात, कोणी एक आयुष्यावर ‘निरागस’ प्रेम करणारा शिक्षक मरणाच्या दारात उभं असताना खरंच बॉलीवूड मधल्या आपल्या आनंद सारखं किंबहुना त्यापेक्षाही लाखपटीने जास्त चांगलं जगतो त्याहीपेक्षा म्हणता येईल की जास्त चांगलं जगायला शिकवतो; आणि हे सगळं त्या शिक्षकाचा कोणी एक विद्यार्थी त्याच्या लेखणीने मांडतो आणि ते पुस्तकरूपात आपल्या हातात येतं आणि याआधी कधीही जितकं भावलं नसेल तितकं ”जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए” हे वाक्य आपल्याला भावतं.

तर हा दूर कोण्या एका  देशातला आयुष्यावर निरागस प्रेम करणारा आणि मरणाच्या दारात उभा असलेला शिक्षक म्हणजे मॉरी आणि त्यांचा कोणी  एक विद्यार्थी म्हणजे मिच (Mitch) आणि मिचने आपल्याला त्याच्या लेखणीतून जो पुस्तकरूपी ठेवा दिलाय तो म्हणजे ‘ट्यूजडेज विथ मॉरी’ हे पुस्तक! ”We are Tuesday people” असं म्हणत मॉरीच्या शेवटच्या काळात दर मंगळवारी मिचने त्यांच्या सोबत मारलेल्या गप्पा म्हणजे हे पुस्तक आहे.  

आपल्या जवळच्या आणि आवडत्या शिक्षकाला ALS सारखा आजार झालाय हे काळताच गेल्या कित्येक वर्षात स्वतःच्या आयुष्यात प्रचंड बिझी, सक्सेसफुल आणि अर्थातच स्वतःसाठीही थांबायला उसंत नसलेला मिच त्याच्या ‘कोच’ बाबतची ही माहिती कळताच अचानक थांबतो. कॉलेज सुटल्यानंतर आजपर्यंत इतक्या वर्षात आपल्या कोचशी त्याचा काहीच संपर्क नसतो तेव्हा आता त्यांना भेटायला जावं की नाही?, ते आपल्याला ओळखतील की नाही? आणि मुळात एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांच्यासाठी वेळ काढून जायला हवं की नाही ? असे असंख्य प्रश्न मनात घेऊन मिच अखेर त्याच्या कोचला एकदा भेटायला जातो आणि नंतर ते असेपर्यंत सतत न चुकता दर मंगळवारी तो सतत त्यांना भेटतच राहतो . 

ह्या पुस्तकाच्या मुखपृष्टावर लिहिलंय तसं ह्या पुस्तकात  तुम्हाला ‘An old man, a young man and life’s greatest lesson’ ह्याविषयी वाचायला मिळतं. हे पुस्तक दिसायला जेवढं छोटं आणि वाचायला जेवढं सोप्प आहे तितकच आयुष्यातल्या सगळ्यात कठीण  प्रश्नाचं (‘what is meaning of life?’) उत्तर देणारही आहे. दर मंगळवारी प्रेम, लग्न, पैसा, भावना, कुटुंब, मृत्यू इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर मारलेल्यया सहज आणि साध्या गप्पा आपल्याला खरंच आयुष्याचे खूप मोठे धडे देऊन जातात.

थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे  मरण समोर असताना त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सामोरं जायची एका सामान्य माणसाची धडपड आहे; पण तीच सामान्य धडपड मॉरींनी  त्यांच्या विचारांमुळे असामान्य केली आहे.

तुम्हाला हे सगळं वाचून वाटेल की  हे पुस्तक कदाचित एक उदासीनतेची लकेर तुम्हला देईल पण विश्वास ठेवा पूर्ण पुस्तक वाचताना एक स्मित कायम तुमच्या मनात असेल; आयुष्याचा अर्थ नव्याने कळालेलं स्मित, नात्यांचा नव्याने अर्थ उलगडलेलं स्मित,आयुष्यात काहीतरी चांगलं करायची वेळ गेलेली नाही ह्या जाणीवेचं स्मित, एका गुरु शिष्याच्या निरपेक्ष नात्याचा अनुभव घेतलेलं  स्मित आणि सर्वात शेवटी हे पुस्तक वेळेत आपल्या हाती पडलं ह्यासमाधानचं स्मित! तेव्हा लवकरात लवकर हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. 

tuesdays with morrie mitch albom sphere pranjali kulkarni english


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/9719/tuesdays-with-morrie—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

प्रांजली कुलकर्णी

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *