लेखक – सायमन सिनेक
पृष्ठसंख्या – २३१
प्रकाशन – पोर्टफोलिओ – पेंग्विन
मुल्यांकन – ३.५ | ५
का जगातील काही व्यक्ती आणि संस्था वारंवार यशस्वी होतात? त्यांच्या यशाचं काही गुपित आहे का? का याला आपण निव्वळ योगायोग समजायचं? जे अँपल कंपनी ला जमलं ते इतर संस्थांना का जमत नाही? राईट बंधूंकडे काही अनुभव नसताना ते विमान कसे बनवू शकले? या सर्व प्रश्नांची उत्तरे लेखक सायमन सिनेक स्टार्ट विथ व्हाय या पुस्तकातून देऊ पाहतो.
सायमन सिनेक यांचा मी एक टेड टॉक बघितला होता त्यामध्ये देखील ते याच विषयावर बोलत होते (सायमन सिनेक उत्तम वक्ते आहेत आणि त्यांचा आपल्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही). सायमन यांच्या मते व्यवसायात तुम्ही काय करता ते महत्वाचं नाहीये. तुम्ही जे करताय ते का करताय ते महत्वाचं आहे. स्टिव्ह जॉब्झ, मार्टिन लुथर किंग, राईट बंधू या सर्वांमध्ये एक सामान धागा आहे तो म्हणजे यांनी सुरुवातीलच आपण जे करणार आहोत ते का करणार आहोत याबद्दल त्यांना जाण होती आणि म्हणूनच ते यशस्वी झाले.
लेखकाच्या मते जगात नायक(लीडर) असतात आणि दुसरे असे नायक असतात जे आपल्याला प्रेरित करतात. मानवी स्वभाव मुळात जे आपल्याला प्रेरित करतात त्यांच्याकडेच आकर्षित होतात आणि विश्वास ठेवतात. जागतिक कीर्तीचे नायक लोकांना कसे प्रेरित करायचे याबद्दल विश्लेषण करण्यात आलं आहे. शिवाय अनेक महत्वाच्या व्यक्तींची आणि संस्थांची केस स्टडी देखील देण्यात आली आहे. लोकांना प्रेरित करण्यासाठी काही संस्था इतर मार्गांचा अवलंब करतात ते मार्ग कोणते हे पुस्तक वाचताना तुम्हाला समजेलच.
मुळात हे पुस्तक सायमन यांच्या गोल्डन सर्कल या सिद्धांतावर आधारित आहे. आणि हा सिद्धांत खूपच सोपा आणि प्रभावी आहे तो तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ मधून समजून घेऊ शकता. त्यासाठी हे पुस्तक वाचण्याची गरज नाहीये. पण जर तुम्ही सायमन चे फॅन असाल आणि तुम्हाला खरंच या सिद्धान्ताबद्दल खोलात जाणून घ्यायचं असेल तरच हे पुस्तक वाचा. याचा अर्थ असा नाहीये कि हे पुस्तक चांगलं नाहीये फरक फक्त एवढाच कि जो सिद्धांत तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचून समजेल तोच सिद्धांत अगदी कमी वेळात या व्हिडिओ द्वारे समजेल.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ