लेखक – चंद्रशेखर नागवरम
समीक्षण – वरुण कमलाकर
पृष्ठसंख्या – १७९
प्रकाशन – कालामोस लिटररी सर्विसेस
मूल्यांकन – ४.६ | ५
काळ जसा बदलत चालला आहे तसे माणसांचे विचारही बदलत चालले आहेत. संप्पत्तीच्या हव्यासापोटी माणूस कुणाचाही जीव घ्यायला तयार झाला आहे. जीव घ्यायला नुसती सुरी किंवा बंदुकीची अवश्यकता नसते तर खुन करायला चपळाइचीही गरज असते. माणसाला या सर्वाचे ज्ञान चित्रपटातून किंवा आजुबाजुला घडणाऱ्या घटनांतून पहायला मिळते.
लेखक चंद्रशेखर नागवरम यांनी एकुण ९ प्रकरणांमधून अत्यंत हुशारीने हे पुस्तक लिहिले आहे. या गोष्टीमध्ये किशोर या व्यक्तीचा खुन झालेला आहे . किशोर हा व्यापारी हर्श शिंदे यांचा व्यवस्थापक आहे, ज्या व्यक्तीने किशोर या व्यक्तीचा खुन केला आहे त्याच व्यक्तीने हर्ष शिंदे चे वडीलांचा खुन केलेला आहे . हा खुन कुणी केला हे शोधुन काढण्यासाठी इन्स्पेक्टर जेम्स व पायव्हेट डिटेक्टीव्ह अमर सागर यांनी तपास घेतला.
किशोर हा अत्यंत साधा व हुशार व्यक्ती या साध्या व्यक्तीचा खुन कोण का करेल व याचा खुन करून कुणाला काय मिळणार आहे. हे जाणुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. इन्स्पेक्टर जेम्स ही केस अक्सिडेंट ( दुर्घटना ) म्हणून घोषित करून ही केस बंद करतात परंतू डिटेक्टीव्ह अमर सागर ही कस अक्सिडेट म्हणून घोषित न करता या सर्व प्रकरणाचा शोध घेतो. हे पुस्तक वाचताना वाचकाचे मन अत्यंत आतूर होईल. लेखकानेही लिहिताना अत्यंत हुशारीने लिहिलेले आहे.
डिटेक्टीव्ह अमर सागर हे सर्व लपलेले संकेत शोधू शकेल का ?? शिंदे कुटुंबातील खुनी कोण आहे ?? हे सारे प्रश्न सोडवण्यात तुम्ही गुंग व्हाल, अडकून जाल. आणि यातच खरं पुस्तकाची खरी गंम्मत आहे.
लेखकाने पुस्तकाच्या शेवटी असे म्हटले आहे कि “संकेत म्हणजे अभिसरण करण्यासाठी गुन्हेगारी खटला चालविणे. घुन्हेगार एक संकेत सोडण्यास बांधील आहेत.” आपण शेवटी यावर बराच विचार करतो आणि पुस्तकाशी त्याला पडताळून पाहतो. वाचून नक्कीच समाधान होईल असच एक उत्कृष्ट पुस्तक आहे.
समीक्षण – वरुण कमलाकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: