लेखक – नारायण धारप
समीक्षण – आदित्य लोमटे
प्रकाशक – साकेत प्रकाशन
मूल्यांकन – ५ | ५
भयकथांचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या नारायण धारप यांचे नाव आताच्या पिढीला नवीन असले तरीही, आपल्या या लेखनाने एक काळ गाजवला होता.
फ्रॅन्केन्स्टाईन हे पुस्तक ही त्यांची अशीच एक कलाकृती. जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे वरदान पण जेव्हा विज्ञान निसर्गाला आव्हान देवुन काही घडवतो, ती विकृती की प्रकृती हा विचार हे पुस्तक सदैव करायला लावते.
विक्टर फ्रॅन्केन्स्टाईन युरोपातील एक उमदा तरुण विज्ञानाची कास धरणारा तरुण त्याने गूढ प्रयोगातून एका निर्जीव शरीराला जीवन कसे द्यायचे हे शोधून काढले आहे. त्याचा असा विश्वास आहे की त्याचा हा निसर्गावरील विजय जगाला विज्ञानाला एक नवीन दिशा देईल .
परंतु, “निसर्गाच्या पंचमहाभूतांनी काहीतरी खेळ करावा एखादी विकृती अपघाताने जन्माला यावी आणि त्या हाती मला मरण यावे….!!!”, असे म्हणणारा बॅरेन फ्रॅन्केन्स्टाईन जेव्हा सूडाने पेटून उठतो तेव्हा मनाला ओलसर शेवाळी भयाचा स्पर्श होतो
त्याचा प्रयोग यशस्वी होतो का?? त्या प्रयोगातून काय निर्माण होते?? बॅरेन फ्रॅन्केन्स्टाईन कोण?? याची उत्तरे आपणाला या पुस्तकात मिळतीलच. कथानकातील 19 व्या शतकातील काळ त्यावेळची परिस्थिती विज्ञानाला वाहून घेण्याची मानवी वृत्ती संशोधन व त्याचे तर्कशुद्ध विश्लेषण हे या कथानकाचे वैशिष्ट.
कथानकातील पात्रे, व कथानकातील उत्सुकता हे त्या गुण वातावरणाचा एक भाग बनविण्याचे कसब एकदम जमून आलेले आहे. यातूनच एक वेगळी मजा निर्माण होते.
कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता लेखक कायम ठेवतो फ्रॅन्केन्स्टाईन च्या गूढ प्रयोगात, नेमके काय साध्य होते हा भाग वाचकाला गुंतवून ठेवतो.
हे पुस्तक वाचताना धारपांच्या लेखणीचे चुणूक दिसते. स्थल-काल वर्णना द्वारे वाचकांचे काळीज गोठवून ठेवण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते.
एकूणच भयकथा /गूढकथा या सदरात मोडणाऱ्या धारपांच्या शैलीत लिहिलेल्या भरदिवसा वाचकांच्या मेंदूला भयाचा दंश करणारे हे पुस्तक एक गुढ मेजवानीच ठरते.
समीक्षण – आदित्य लोमटे
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: