लेखक – नारायण धारप
समीक्षण – आदित्य लोमटे
प्रकाशक – साकेत प्रकाशन
मूल्यांकन – ४.५ | ५
भयकथा गूढकथा यांचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप हे आताच्या पिढीसाठी नवीन लेखक आहेत. आपल्या रहस्यमय लेखनाने धारपांनी एकेकाळी मराठी मनावर राज्य केले.
माणसाला नेहमीच रहस्य जाणून घ्यायला आवडते. गूढ रहस्य जाणून घेण्याची मूळची उत्कंठा आणि उत्सुकता ‘सावधान’ कथासंग्रह पूर्ण करतो आणि समाधान मिळतं. आजच्या काळात मराठी भाषेत भय कथा विज्ञान कथा (सायन्स फिक्शन) लिहिणारे खूपच कमी लेखक आहेत विज्ञान कथेला भयाचे किनार देऊन त्याची एक वेगळी शैली आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळते. या पुस्तकातील कथा या सायन्स फिक्शन प्रकारातील भयकथा आहेत कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला कथेत गुंतवून ठेवणे, इतकेच नाही तर वाचकाला त्या रहस्यमय वातावरणाचा भाग बनविण्याचे कसब हे पुस्तक पूर्ण करते. या पुस्तकातील कथा वाचकाला गुंतवून तर ठेवतातच; त्याचबरोबर रहस्यमय गूढ शक्ती मानवी आकलना पलीकडील त्याचे विश्लेषण त्याचे भव्य प्रदर्शन वाचकांची मती गुंग करतात.
यातील “काळाला तिरका छेद” सारख्या कथा या काळातील प्रवास अथवा टाईम ट्रॅव्हल सारख्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत या कथांचे कथानक मांडताना कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी लेखकाने पुरेपूर घेतलेली आहे.
या सारखेच अजून एक कथा म्हणजे “आकाशात तरंगणारा डोळा” ही तरच विज्ञान कथाच…!!!
विज्ञानातील संकल्पनांच्या तार्किक आधाराने बनवलेली गूढ वातावरणातील ही कथा धारपांच्या लेखणीची चुणूक दाखवते यासारख्या अनेक कथा या वाचकांना खिळवून ठेवतात.
ह्या कथा जेवढ्या रहस्यमय तेवढ्याच रटाळ होणार नाहीत याची पुरेपूर काळजी लेखकाने घेतलेली आहे.
या जगात मानवाला न समजणार्या अगम्या नैसर्गिक गोड शक्ती आहेत त्यांचे भयप्रद अनुभव या कथांमध्ये वाचायला मिळतील.
नारायण धारप यांचा हा कथासंग्रह रहस्यमय गूढ कथांची मेजवानी ठरतो. यातील सर्व कथा नवीन जुन्या मराठी वाचकांसाठी नक्कीच आकर्षक ठरतील यात शंकाच नाही.
समीक्षण – आदित्य लोमटे
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: