लेखक – ख्रिस्तोफर .सी. डॉयल
समीक्षण – वरूण कमलाकर
पृष्ठसंख्या – ३८२
प्रकाशन – ओम बुक्स इंटरनॅशनल
मूल्यांकन – ४.७ | ५
इतिहास हा विषय प्रत्येक व्यक्ती शिकत आलेला आहे. प्रत्येकाला इतिहास आवडतोच असे नाही. काही जणांना इतिहास ऐकायला आवडतो तर काही जणांना इतिहास जाणून घ्यायला आवडतो तर काही जणांना इतिहास आवडतच नाही. पण इतिहासात एक घटक असतो तो म्हणजे ऐतिहासिक रहस्य. अशीच एक कहाणी लेखक ख्रिस्तोफर डॉयल या पुस्तकातून आपल्या भेटीला घेऊन आले आहेत.
इ.स.२४४ मध्ये अशोका दि ग्रेट याने शोधून काढलेले अत्यंत भयानक रहस्य ज्याचे सुलगावे महाभारतात अत्यंत हुशारीने लपविलेले आहेत. संपूर्ण विश्वाला नष्ट करू शकेल असे रहस्य २२०० वर्षासाठी लपून राहिलेले आहे. हे रहस्य कुणा वाईट व्यक्तीच्या हातात पडले तर त्याच्या मदतीने तो संपूर्ण विश्व नष्ट करू शकेल .
ही एक रहस्यमय कहाणी काल्पनिक स्वरूपाची आहे. एका नियुक्त अणुवैज्ञानिकाचा खुन झालेला आहे. ह्या अणुवैज्ञानिकाकडे २००० वर्षापासून लपून राहिलेने एक रहस्य आहे. ह्या अणुवैज्ञानिकाचा खुन होण्याआधी २००० वर्षे लपून राहिलेले रहस्य तो त्याच्या भाच्याला ईमेलद्वारे त्यातले काही सुलगावे देतो. त्या रहस्याची जाणीव एका दहशतवादी संघटनेच्या व्यक्तींना झालेली आहे. ते रहस्य मिळवण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.
ह्या रहस्याचा शोध घेण्यासाठी विजय व त्याचे काही सवंगडी निघाले आहेत. ह्या खतरनाक प्रवासामध्ये त्यांना खूप भयानक प्रसंगांना सामोरे जावे लागते. दहशतवाद्यांना ह्या रहस्याचा वापर करुन संपूर्ण जगात दहशत पसरवायची आहे. हे पुस्तक वाचत असताना वाचक रहस्याच्या विश्वात नक्कीच हरवून जाईल.
कथेतला हा रहस्यमयी प्रवास वाचकांना प्रसन्न करून जाईल. कथेत पुढे काय होईल हे जाणून घेण्यागठी वाचकाची उत्कंठा पानागणिक वाढत जाईल. अन् पुस्तकाच्या शेवटपर्यंत वाचक तितकाच आतूर राहतो जितका पुस्तक वाचण्याआगोदर होता.
या कथेत सहा जण मिळून ह्या रहस्याचा शोध घेत आहेत पण त्यात एक व्यक्ती जो जौनगर्हचा राजा आहे त्याने पैशांच्या हव्यासापोटी दहशतवाद्यांबरोबर हातमिळवणी केलेली आहे. या सर्वाचा ठावठिकाणा अगोदर न लागल्यामुळे रहस्यशोधकांवर जे संकट ओढावले आहे ते वाचनीय आहे. अत्यंत सुंदर व उत्कृष्ट असणारे हे पुस्तक, तुम्ही नक्कीच खरेदी करून वाचू शकता!!
समीक्षण – वरूण कमलाकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
किंडल आवृत्ती (मराठी) विकत घ्या
संबंधित व्हिडिओ