लेखक – अर्नेस्ट हेमिंग्वे
पृष्ठसंख्या – ११३
मूल्यांकन – ४.८ | ५
अर्नेस्ट हेमिंग्वे हे विसाव्या शतकातील एक प्रसिध्द कथा-कादंबरीकर म्हणून गाजलेलं व्यक्तीमत्व आहे. त्यांनी त्यावेळी कित्येक हेलावून टाकणाऱ्या विषयांना हात घातला होता.
‘इन अवर टाइम’ ही त्यांच्या मिशिगन येथील बालपणावरील कथासंग्रह तर ‘द सन ऑल्सो राइझेस’ व ‘अ फेअरवेल्स टू आर्म्स’ ह्या पहिल्या महायुद्धावर लिहलेल्या कादंबऱ्याही लोकांनी आवडीने वाचल्या. “युद्धामध्ये कोणीही मेलं, तरी अशा प्रत्येक माणसाबरोबर तुमचासुद्धा थोडासा अंश मरतच असतो.” या दोन ओळी नेहमी तोंडावर असलेली फॉर हुम दी बेल टोल्स या कादंबरीत हेमिंग्वेची युद्धविरोधी भूमिका बघायला मिळते.
काही काळ हेमिंग्वे याच लिखाण थांबल असताना अचानक त्यांच ‘दी ओल्ड मॅन अँड दी सी’ या कादंबरीने सगळीकडे खळबळ माजवली. पहिल्यांदा ही कादंबरी लाइफ या नियतकालिकात छापून यायला लागली. हळूहळू मात्र तिची लोकप्रियता एवढी वाढली कि दोन दिवसात लाइफ या नियातकालिकेच्या ५.३ लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. नंतर पुस्तक छापल्यानंतर अल्पश्या काळातच १.५३ लाख प्रती विकल्या गेल्या नंतर ६ महीने या पुस्तकाने काही मोकळा श्वास घेऊ न देता, बेस्टसेलर म्हणून नावारूपाला आलं.
‘ओल्ड मॅन अँड दी सी’ या पुस्तकाची गोष्ट त्यांनी खूप सरळ आणि सुंदर भाषेत मांडली आहे. सॅंटियागो आणि मर्लिन मासा या दोघांमधील संघर्षाची गोष्टी लेखकाने रंगवल्या आहेत. सॅंटियागो हा म्हातारा मच्छिमार जेव्हा मच्छिमार करण्यासाठी समुद्रात जातो तर त्याला ८४ दिवस एकही मासा मिळत नाही त्यामुळे तो खूप हताश होतो. एके दिवशी नित्याच्या सवयीप्रमाणे तो पुन्हा समुद्रात मासेमारी करायला जातो, तर मर्लिन नावाचा मासा त्याच्या जाळ्यात अडकतो. अडकलेला मासा तो समुद्र किनाऱ्यावर आणणार त्यात त्या माशावर शार्क हल्ला करतात आणि तो पुन्हा रिकाम्या हाताने परततो. तरीही तो आशा सोडत नाही हे लेखकाने रंगवले हेमिंग्वे यांच्या या पुस्तकाला १९५३ साली ‘पुलिटझर’ हे पारितोषिक मिळालं होतं. एक नवी आशा एक नवी उमंग देणार हे पुस्तक आहे. १९५४ साली हेमिंग्वे यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं त्यात ह्या पुस्तकाचा मोठा सहभाग होता. पुस्तक छान आहे नक्की वाचा.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ