लेखक – अण्णाभाऊ साठे
पृष्ठसंख्या – १०४
मूल्यांकन – ४ | ५
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. काही काळानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरकरांची शिकवण अनुसरून ते दलित कार्याकडे वळले. दलित वर्ग, कामगार वर्ग यांनी अनुभवलेल्या विदारक अनुभवाना सगळ्यां पर्यंत कसं पोहचवता येईल? यासाठी त्यांनी कथांचा वापर केला. अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, लघुकथासंग्रह, लोकनाट्य, पोवाडे, प्रवासवर्णन अशा कित्येक साहित्यातून त्यांनी आपल्या लेखनशैलीतुन जनसामान्यांपर्यंत पोहचून जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
माकडीचा माळ ही कादंबरी अवघ्या शंभर पानांची आहे.
कादंबरीतून यंकू माकडवाला आणि त्याची मुलगी दुर्गा यांची गोष्ट प्रभावीपणे मांडण्याचा प्रयन्त अण्णा भाऊ साठे यांनी केला आहे. या गोष्टींमध्ये प्रामुख्याने लेखकांनी आपलं पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती करण्याऱ्या लोकांची जीवनशैली कशी असते, हे या कादंबरीतून पाहायला मिळतं. गावोगावी जाऊन पाल उभारून तिथे आपला संसार उभा करणं, मग जगण्यासाठी आपआपसातील संघर्ष, व्यसनं, अज्ञानीपणा त्यामुळे उद्धभावणारे प्रसंग, विचारांचं मागासलेपण, प्रथा, वेगवेगळ्या जमाती, त्यांचे वेगवेगळे धर्म, आणि रूढी अशा सगळया गोष्टी अस्वस्थत करून जातात. ‘डोंगरची मैना’ हा चित्रपट ह्याच कादंबरी आधारीत आहे.
या गोष्टीचा नायक हा यंकू माकडवाला. यंकू हा खूप समजूतदार आणि ‘चांगला माणूस’ म्हणुन माळावर परिचित असतो. नाण्याला जशा दोन बाजु असतात तशीच चांगल्याला ही वाईट बाजू म्हणून कपटी मनाचा ‘पाऱ्या’ हा माणूस त्याच माळावर राहतो. प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणजे कोणी माकडांचा खेळ करून, कोणी नागांचा नाच दाखवून तर कोणी दारोदारी भीक मागून आपलं पोट भरण्याच्या तळमळीत आहे. पोटाच्या खळगीसमोर कुणाचं काही चालत नाही अशावेळी ते वानर, मुंगूस, ससा, कोल्हे या सारख्या प्राण्यांची शिकार करून आपली गरज भागवताना दिसतात. यंकू माकडवाला याला दुर्गा नावाची मुलगी आहे. तिची आई वारल्यानंतर तीला प्राणापेक्षा जपण्याचं वचन त्याने आपल्या बायकोला दिलं आहे. या प्रवासात गंग्या नावचं एक माकड आहे, त्त्याचाही यंकुवर खूप जीव आहे. गावातील काही लोकांना यंकू विषयीची आसुया वाटते. त्याचा काटा काढुन तारुण्यात प्रदार्पण करणाऱ्या दुर्गेला कस मिळवता येईल याचा कट पालवरची आणि गावातील काही मातब्बर लोक शिजवत आहेत. ह्या योजनेचं पुढे काय होतं, त्यांना कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं इत्यादींचं जिवंत वर्णन कथित केलं आहे, गोष्ट शेवपर्यंत वाचकाला धरून ठेवते. माकडीचा माळ हेच नाव हया कादंबरीला का दिलं असावं याच उत्तर आपल्याला शेवटी मिळतं, ते जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: