लेखक – बेटी मेहमूदी
पृष्ठसंख्या – ३०४
मूल्यांकन – ४.८ | ५
तब्बल ३२ वर्ष जुनी असली तरीही आज सुद्धा एखाद्याला जगण्याची नवी उमेद देणारी अशी ही गोष्ट आहे. १९९७ साली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि साधारण २००४-०५ साली आमच्या घरी हे पुस्तक मी पाहिलं. अर्थात ५-६वीत असल्याने असं कोणतंतरी पुस्तक वाचायची तेवढी आवड निर्माण नव्हती झाली. पण ते पुस्तक काही माझ्या डोक्यातून जाईना आणि ९वीत असताना प्रथम मी ते पुस्तक सुट्टीत वाचायला घेतलं. हे माझं पहिलाच मोठा पुस्तक असेल आणि कदाचित पहिलाच जे वाचून ‘सून्न होणे’ ह्या वाक्प्रचाराचा खरा अर्थ मला सापडला.
लेखिकेने स्वतःचा अनुभव लिहला असल्याने कथेची तीव्रता किंवा दाहकता अगदी स्पष्ट जाणवते. हे पुस्तक वाचून जेव्हा आपण त्या खऱ्या बेट्टी चा फोटो बघतो तेव्हा आपोआप डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाही राहत. ह्यात कुठेही खोटं, मनोरंजनासाठी रंगवलेले प्रसंग असा काहीही नाही. तिचा अमेरिका ते तेहरान ते पुन्हा अमेरिका हा प्रवास ह्यात मांडला आहे. आणि तो प्रवास होता फक्त का आयुष्याला कलाटणी देणारं एक वाईट स्वप्नं हे पुस्तक वाचूनच माणूस सांगू शकतो.
अमेरिका, आणि इराण ह्यांचे राजकिय संबंध आज हि तणावपूर्ण आहेत तर आपण कल्पना करू सह्कतो ३० वर्षांपूर्वी ते कसे असतील?? अशा काळात एक अमेरिकन नागरिकत्व असलेली स्त्री, एकदा घटस्फोट होऊन एका इराणी माणसाची पुन्हा लग्न करून, एक ७-८ वर्षांची मुलगी पदरात घेऊन फक्त तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेऊन तेहरान येते आणि तिचा नवीन आयुष्य सुरु होतं. साहजिकच हे वाचून कोणालाही किती धोका पत्करून ती इथपर्यंत अली असेल ह्याची कल्पना येईल. पण २ आठवड्यांच्या बोलीवर ती मूडी ह्या तिच्या नवऱ्यासाठी हे धाडस करते आणि आयुष्यभराची चूक करून बसते.
प्रश्न फक्त अमेरिका आणि इराणचा नसून चालीरीती, विचारसरणी, स्वातंत्र्य ह्यांचा तफावतीचा आहे हे तिला लवकरच लक्षात येत. पण हे सगळं कळत असताना तिचे अमेरिकेला जायचे सगळे मार्ग कसे बंद होतायेत हे ती डोळ्यादेखत बघत असते. कितीही सोसावं लागला तरी हिम्मत हरायची नाही, हे ती पक्क करते आणि तिचा असाधारण लढा सुरु होतो. नवऱ्याची आता काहीही मदत होणे शक्य नाही असे तिला पहिला काही महिन्यातच ध्यानात येते आणि वेगवेगळी माणसं ती जोडायला सुरु करते आणि मग तिचा अमेरिका चा प्रवास सुरु होतो.
४-५ ओळींमध्ये ह्या सगळ्याचे वर्णन करणे अगदीच शक्य नाही आणि म्हणूनच पुस्तक वाचणंच योग्य ठरेल. आपण किती लहान सहान प्रश्नांचा बाऊ करतो हे मला बेट्टीचा संघर्श बघून जाणवलं. आपल्या घरात आपल्या देशात सुखी असणं कशाला म्हणतात ह्याची जाणीव ह्या पुस्तकाने होते. समोर कितिही अशक्य परिस्थिती असली तरी आत्मविश्वास आणि चिकाटी आपल्याला त्यावर मात करायला शिकवते हेच ह्या पुस्तकाचे सार आहे. आणि म्हणूनच एखाद्याचा आयुष्य पणाला लागून सुद्धा माणूस त्यातून कसा बाहेर पडतो हे बघायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ
‘इस दुनिया में सबसे बडा योध्दा मां होती है’ या वाक्यासोबत आपण सगळेच परिचित आहोत. ह्याच वाक्याला न्याय देणारी व वाचकांना खिळवून ठेवणारी घटना ह्या पुस्तकातून मांडण्याचा हा प्रयत्न.
स्वतंत्र विचारसरणीला प्राधान्य देणारया प्रगतशील अशा अमेरिका देशातून जेव्हा लेखिकेला केवळ नवरयच्या आग्रहाखातर इराणला यावे लागते तेव्हाच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. इराणला आल्यावर तेथील लोकांची विचारसरणी, स्त्रीयांना मिळणारी दुय्यम वागणूक, तरीही ‘पती हाच परमेश्वर’ असे मानणारया स्त्रिया, तेथील अस्वछता, ढिसाळ कारभार ह्यामुळे बेट्टी व मुलगी मोहताबच्या मनात स्वगृही परतण्याची इच्छा अजुनच तीव्र होते.
परंतू नवरयच्या वागणूकीवरुन त्याचा इराणलाच कायम राहण्याच्या डाव जेव्हा बेट्टी समोर उघडकीस येतो तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. आणी मग बंड केलेल्या बेट्टीला दडपण्यासाठी सुरु होते नजरकैद.
ह्याच नजरकैदेतून बेट्टी व मोहताब ह्यांची सुटका होते की नाही, हे समजून घेण्यासाठी शेवटी पुस्तकच वाचावे!
आईची मुलीच्या स्वातंत्र्यासाठीची तळमळ, प्राणप्रिय मुलीपासुन होणारी ताटातूट, स्वगृही परतण्याची इच्छा, स्वातंत्र्याची किंमत, 18 महिन्याच्या ह्या नजरकैदेतून सुटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा हा थरार नक्कीच वाचकांना खिळवून ठेवतो.
एका आईच्या लढावू वृत्तीला ह्या पुस्तकातर्फे एक सलाम असेल असेच आपण म्हणू शकतो !