लेखक – डॉ. जोसेफ मर्फी
समीक्षण – अक्षय बोडके
पृष्ठसंख्या – २४९
मराठी अनुवाद – संकेत कोरडे
प्रकाशक – मंजुल पब्लिशिंग हाऊस
मूल्यांकन – ४.३ | ५
या पुस्तकाचे लेखक डॉ. जोसेफ मर्फी यांनी मनोविज्ञान शास्त्रामध्ये PH.D. केल्यानंतर जातीत जास्त वेळ आशियाई धर्माचं अध्ययन करण्यात व्यतीत केला. या अभ्यासासाठी ते भारतातही येऊन गेले. विश्वातील प्रमुख धर्माच्या अभ्यासानंतर त्यांना असं लक्ष्यात आल की, संपूर्ण विश्वावर एकाच शक्तीच राज्य आहे, ती शक्ती सर्वांमध्ये स्थित आहे. ही शक्ती म्हणजे अंतर्मनाची ताकद
या पुस्तकामध्ये मन म्हणजे काय? अंतर्मन आणि बाह्य मन यातील फरक, नेहमी आनंदी व उत्साही कसं रहावं? नकारात्मक विचारातून आणि नैराष्यातून मुक्त होण्याचे मार्ग? आर्थिक समृद्धीच सूत्र, निरामय आरोग्यासाठी मानसिक उपचार, अपयशातून यशाकडे जाण्याचा राजमार्ग, सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकि्ली, नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्याचे मार्ग, आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकतो तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकतो, आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकतो, भितीतून मुक्त होण्याचा रामबाण उपाय सांगितले आहेत.
आपण जसा विचार करत असतो तसे आपण असतो आणि घडत असतो हे लेखकाने अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने सांगितले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरवलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवण्याचे रहस्य सांगणारे आहे. तुमच्या आयुष्यातील शंका कुशंका, दुःख, यातना आणि अपयश यांच्या गर्तेतून तुम्हाला वर काढण्यासाठी तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करावा तसेच यात दिलेल्या तंत्राचा वापर करून तुम्ही चमत्कारिक शक्तीला मिळवू किंवा प्राप्त करू शकता अशी लेखकाला पूर्ण खात्री आहे.
हे पुस्तक वाचून आपण आपले विचार बदलून संपूर्ण जीवनच बदलू शकतो. यामध्ये दिलेल्या तंत्राचा अवलंब करून आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होऊ शकतो.
आपण आता जे काही आहोत ते का आहोत? तसेच आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते का घडत आहे? या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला लगेच समजतील.
समीक्षण – अक्षय बोडके
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ