लेखक – क्रिस गुल्लेबाऊ
पृष्ठसंख्या – २६८
प्रकाशन – पॅन मॅकमिलन
मूल्यांकन – ३.८ । ५
फायर युअर बॉस, डू व्हॉट यु लव्ह अँड वर्क बेटर टू लिव्ह मोर
मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करायचा ठरवतो तेव्हा भांडवलाचा प्रश्न समोर उभा ठाकतो. व्यवसाय करण्यासाठी मोठं भांडवल गरजेच असतं असा एक समज लोकप्रिय आहे. तो बऱ्याच अंशी खरा आहे पण $१०० स्टार्टअप हे अंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं पुस्तक या लोकप्रिय विचाराला डावलून, “कमी गुंतवणूकीमधून व्यवसाय” हा एक नवा विचार मांडत.
लेखक क्रिस हे स्वतः उद्योजक आहेत, वयाच्या ३५ वर्षापर्यंत त्यांनी जवळपास संपूर्ण जग पालथं घातलं आहे. त्यांच्या मते प्रत्येकाने स्वतंत्र होऊन जीवन व्यतीत करायला पाहिजे. एखाद्या व्यवस्थेतील लहानसा भाग होऊन दुसऱ्यांना श्रीमंत बनवण्यापेक्षा स्वतः व्यवसाय उभा करून तो वाढवणे कधीही उत्तम. नेपोलियन हिल प्रमाणेच क्रिस यांनीही बऱ्याच मुलाखती घेतल्या. फक्त या मुलाखती ज्यांनी कमीत कमी गुंतवणुकीतून व्यवसाय उभा केला त्यांच्याच होत्या. कमीत कमी गुंतवणूक करून व्यवसाय करता येतो याचे असंख्य पुरावे हे पुस्तक देत. पण त्याबरोबरच व्यवसायाचे अनेक पैलू आपल्यासमोर मांडत.
आज देशात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. व्यवसायाशी काडीमात्र संबंध नसणारे देखील या क्षेत्रात येत आहेत. त्यांच्यासाठी तर हे पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहकांकडून पैसे येतील याची खात्री करा आणि पैसे येण्याची सुविधा पहिले तयार करा मग पुढच्या कामाला लागा असं क्रिस यांचं परखड मत आहे. जर तुमच्याकडे व्यवसायासाठी एखादी कल्पना असेल तर ती योग्य आहे कि नाही हे कास तपासायचं, एका पानाचा बिझनेस प्लॅन कसा असावा?, फ्रॅंचाईझ कशी निर्माण करावी? अपयश कसं हाताळावं? यांसारख्या अनेक विषयांवर संक्षिप्त स्वरूपात लेखकाने लिहिलं आहे.
जर तुम्ही या पुस्तकाकडून अशी अपेक्षा करत असाल कि हे पुस्तक वाचून तुम्ही लगेच व्यवसाय सुरु करू शकाल तर तसं नाहीये. तुम्हाला विचार तर करावाच लागेल आणि व्यवसाय उभारणीचे कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत. हे पुस्तक फक्त तुमच्यासाठी एका दिशादर्शकाचं काम करेल. हे पुस्तक तुम्हाला काय शक्य आहे याची जाणीव करून देईल, तुमच्या विचारांच्या कशा रुंदावेल. जर तुम्ही व्यवसायात नवखे असाल तर हे पुस्तक आणि अशी असंख्य पुस्तके वाचण्याशिवाय गत्यंतर नाही. पण जर तुम्ही वव्यसायात आधीपासून प्रस्थापित असाल तर हे पुस्तक तुम्ही स्किप करू शकता.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ