लेखक – राघव अरोरा
समीक्षण – वरुण कमलाकर
पृष्ठसंख्या – ०८
प्रकाशक – कलामोस सर्व्हिसेस
मूल्यांकन – ३.५ | ५
रहस्यमयी गोष्टी म्हंटल्यावर, वाचक पुस्तक वाचायला उत्सुक होतो. रहस्यमयी गोष्टी असतातच अशा की प्रत्येक वाचकाला वाचल्याशिवाय रहावत नाही. अशीच एक रहस्यमयी लघुकथा लेखक राघव अरोरा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. अवघ्या ८ पानांची ही कथा, पण आपल्या मनात विचारांचं काहूर माजवेल अशी आहे.
हि कथा आहे श्री. रोहन सेन व श्रीमती. पलक सेन या नुकत्याच विवाहित झालेल्या जोडप्याची. या रहस्यमयी कहाणीची सुरूवात एका हॉटेलच्या खोलीमध्ये मधुचंद्राच्या निमित्ताने गेलेल्या या नवीन विवाहितांपासून होते. एक इतिहासकालीन राजा अणि त्याने केलेली एका व्यक्तीची हत्या यामुळे शापित असलेली ती खोली आणि यातून निर्माण होणारे प्रसंग, यातूनच एक वेगळ्या घाटनीची कथा पाहायला मिळते. या रोमांचक अशा लघू कहाणीचा सर्वच वाचकांनी आस्वाद घ्यावा.
अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या कथेत कोरोना या विशाणूमूळे करण्यात आलेला लॉकडाऊनचा संदर्भ अतिशय सुयोग्य अशा पद्धतीने जुळावला आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचताना, तुमच्या मनात एक वेगळी भावना आणि विचार सतत घर करून असतील. नक्कीच आवडेल अशी कथा.
समीक्षण – वरुण कमलाकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: