लेखक – फारूक नाईकवाडे
समीक्षण – वैष्णवी सुरडकर
पृष्ठ्संख्या – २४२
प्रकाशन – राष्ट्रचेतना प्रकाशन
मुल्यांकन – ३.६ | ५
ब्रिटिशांनी दीडशेहून अधिक राज्य केले ते स्टील फ्रेम च्या भरवश्यावर! एका बाजूला देशाचे धोरण ठरवण्याचे आणि सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याचे काम ही नोकरशाहीची स्टील फ्रेम पार पाडते. या स्टील फ्रेम पर्यंत पोहोचण्याचा मार्ग अनेकांना माहीत नसतो, या मार्गाची ओळख हे पुस्तक करून देते, असे मला वाटते.
लेखक फारुख नाईकवाडे सर्वसामान्यांना ही स्टीलफ्रेम उलगडून दाखवतात आणि विद्यार्थ्यांमध्ये ती भेदण्याची जिद्द निर्माण करतात. लेखक केवळ पुस्तकात समाविष्ट असलेल्या यशस्वी उमेदवाराच्या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेत नाहीत तर सोबतच शिकवण, प्रत्यक्ष जागेवर आणि खरोखर काम करतांना येणाऱ्या अडचणी, राजकारण व समाजाचा येणारा संबंध याचा मागोवा घेतात. जे चांगलं काम करताहेत ते सर्वांसमोर आलं पाहिजे ही लेखकांची अंतरीची घालमेल होती ती पुस्तकरूपाने शब्दबद्ध झाली आहे.
जिल्हापातळीवर प्रशासकीय अंमलबजवणी करण्यापासून तर केंद्रास्तरावर पोलिसिज(सेवा) तयार करण्यापर्यंत महत्वाची भूमिका निभावणारे IAS, कायद्याचं राज्य अबाधित राखणारी IPS, विदेशात देशाचे प्रतिनिधित्व करून जागतिक मंचावर देशाची भूमिका मांडणारे IFS अश्या भारतभर विखुरलेल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतात.
अशा अनेक कहाण्या पुस्तकातून वाचायला मिळतात. आपल्याला त्यातून मिळणारा बोध हा हाही तितकाच महत्वाचा आहे असं मला वाटतं. नक्कीच एक खास आकर्षण असलेलं हे पुस्तक आहे जरूर वाचा.
समीक्षण – वैष्णवी सुरडकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: