लेखक – राजा मोहन
अनुवाद – इंद्रायणी सावकार
समीक्षण – शुभम येरुणकर
पृष्ठसंख्या – २१६
प्रकाशन – रिया पब्लिकेशन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक लेखक राजा मोहन यांनी लिहिले आहे. राजा मोहन हे पत्रकार आणि परदेशासंबंधीचे विषयाचे तज्ञ आहेत. त्यांची एक खासियत अशी आहे की ते लिहायला बसले की ते लिखाण पूर्ण केल्याशिवाय बैठक सोडत नाहीत. राजा मोहन यांनी आपला भारत आपल्या घरात पोहोचवला. आपण या देशात जन्मलो आणि वाढलो; पण तो देश एका व्यक्तिरेखेचे रूप घेऊन आपल्या मनात संचारला नाही. मोदीज वर्ल्ड ते साध्य करण्याचा प्रयन्त करू पाहत.
‘मोदीज वर्ल्ड’ मध्ये विस्तारमान भारताच्या परिणामाची व्याप्ती स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताच्या परदेशी धोरणांमुळे देशाला तथा समस्त जगाला चकित करून सोडले आहे. मोदींनी रशियाशी पूर्वापार चालत आलेले स्नेहसंबंध आहेत, ते जपले. जपान, ऑस्ट्रेलिया या देशांशी आपली धोरणात्मक भागीदारी आहे. तिथे त्यांनी अधिक जवळीक साधली. शेजारी राष्ट्रांविषयीचे भारताचे धोरण विशेष भक्कम केले. परदेशस्थ भारतीयांशी पुन:श्च नाते अधोरेखित करीत असतानाच मोदींनी भारतीय राजनीतित आश्चर्यकारक व्यक्तिगत ऊर्जा संचारवली. असे विलोभनीय दृश्य राजीव गांधींच्या नंतर पुन्हा कधीही दिसले नव्हते. मोदींची बोलण्याची शैली, भाषण करताना आवाजातील चढ-उतार आणि त्यांचा प्रामाणिकपणा हे सारं ‘मोदीज वर्ल्ड’ या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांसोबत भारताचे हितसंबंध जोडले आणि त्यांच्यासोबत अनेक करारही केले त्यामुळे भारताला त्याचा फायदा होईल.
‘मोदीज वर्ल्ड’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बलदंड राजनीतीची व भारताचे जगातील स्थान उंचावण्याच्या त्यांच्या महत्वकांक्षेची कथा सांगते. मोदींच्या परदेशाविषयक धोरणांचे दर्शन घडवते. त्यांच्या आधीच पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व मनमोहन सिंग यांच्याकडून त्यांना या परदेशी धोरणांचा वारसा मिळाला. त्याच पायावर पुढील इमारत उभारण्याचा व भारतासाठी महत्वकांक्षी आंतरराष्ट्रीय इमेज निश्चित करण्याच्या मोदींच्या प्रयन्तांचा उहापोह म्हणजेच ‘मोदीज वर्ल्ड’.
समीक्षण – शुभम येरुणकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ