palati zade marathi book review cover

पळती झाडे

पोस्ट शेयर करा:

लेखक  – नारायण धारप

समीक्षण – आदित्य लोमटे

प्रकाशक – साकेत प्रकाशन

रेटिंग – ४.५ | ५

भयकथाचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप आताच्या पिढीसाठी नवीन आहेत. मराठी साहित्यात भयकथा, गूढकथा, विज्ञान कथा यांचे विश्व बनवून साहित्य विश्वात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

ज्या काळात प्रसार माध्यमांची फारशी चलती नव्हती त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. वाचनालयात त्यांची पुस्तके वाचायला मिळविण्यासाठी वाचक रांगा लावत असत.ही गोष्ट त्यांच्या लेखनाची लोकप्रियता स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

मानवाला नेहमी रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा असते याच जिज्ञासा या भावनेत कथा कथा नायकांच् गूढ, रहस्यमय अनुभव प्रस्तुत कथासंग्रहात नारायण धारपांनी आपल्या खास शैलीत अगदी धारप स्टाईलने मांडला आहे. या कथानकातील कथा या भयकथाच् आहेत. धारपांची चित्रमय भाषा कथेतील घटना वाचकांच्या डोळ्यासमोर उभी करते.

प्रस्तुत कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत, त्यापैकी पळती झाडे पाहूया ही कथा भय विज्ञान कथा आहे. “श्रीरंग नावाचा कथा नायकाची सोलापूरला बदली होते व तो आपल्या मामा-मामी कडे राहायला जातो तेथे त्याला चंदी भेटती व एक दिवस ती अचानक गायब होते.” ही कथा वाचताना धारपांच्या सिद्धहस्त लेखणीचे जाणीव आपल्याला होते.

“ती विलक्षण गंभीर झाली होती कोणत्यातरी तणावाखाली होती तिचा मूळ संसर्गजन्य होता आम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातच होती बालकनी चा पुढचा भाग तर आणखी अंधारलेला होता तिकडे चंदी एकटक पाहत होती आणि मग तिने माझा डावा हा घट्ट धरला ते पहा ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली पण तिने मला सांगायची जरूरीच नव्हती मलाही ते दिसत होतं ते किंवा ती बालपणीच्या त्या टोकाकडून तो आमच्या दिशेने येत होता” यासारखे प्रसंग वर्णाने मनाला भयाने ग्रासून टाकतात.

भयकथासंग्रहातील सर्व कथा या मानवी व मानवी यातील रेखा स्पष्ट करतातच परंतु त्याचबरोबर आमानवी शक्तीच्या मानवी मनावर चे परिणाम व भयाचा दंश करतात. नेहमीच्या एक रेषीय मितींमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा भय अतींद्रिय मीतिची जोड देत वाचकांना नेहमीच्या त्रिमितीय आयुष्याचा पट पडदा हलवणारे कसब धारकांना अवगत आहे. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवतात. धारपांची भाषा चित्रमय आहे वाचकांच्या डोळ्यासमोर घटना प्रत्यक्ष उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आहे. अज्ञात अकल्पनीय आणि अतर्क्यचा मागोवा घेणाऱ्या या कथा निश्‍चितपणे मराठीतील श्रेष्ठ भयकथा ठरतात. शेवटी पळती झाडे हा कथासंग्रह भयकथा प्रेमींसाठी नक्कीच मेजवानी ठरतो.

समीक्षण – आदित्य लोमटे

narayan dharap palati zade saket aaditya lomate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/12313/palati-zade—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *