लेखक – व. पू. काळे
समीक्षण – आदित्य लोमटे
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
रेटिंग – ४.८ | ५
मराठी साहित्यातील लोकप्रिय लेखक कादंबरीकार कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व पु काळे. यांची पार्टनर ही एक अविस्मरणीय कलाकृती. तशी ही प्रेम कहानी पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती लिहिली फुलवली वपू नी. “नरक म्हणजे काय, तर आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणे म्हणजे नरक.” अशी सुरुवात करून वाचकांचा मनावर पहिल्या पानापासून ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ताबा घेते.
कथा नेहमीसारखीच त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे अशा धाटणीची. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय आहे? अहो पण त्याला टिपिकल वपुंचा परीसस्पर्श झाला आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला जागोजागी येत राहतो. एका औषधाच्या दुकानात काम करणारा तो एक दिवस त्याला ती भेटते नव्हे, दिसते कुठे? एका इमारतीच्या पायाभरणी समारंभात. कशी होती ती, पार्टनर म्हणतो त्याप्रमाणे “पोरगी म्हणजे झुळुक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही.”त्याच्यासाठी ती झुळुक होती पण ती गेली नव्हती तर फेर धरून नाचत होते स्पर्शाचा गोफ विणत होती सुखाने वेदना देत होती पण मोरपीसने कधी अंगावर ओरखडा उठतो का?
अशाप्रकारे फुलत गेलेली की प्रेम कहाणी यात अनेक जण आहेत पण भाव खातो तो पार्टनर!!!. औषधा निमित्ताने दुकानात येणाऱ्या अनेकांपैकी एक “मुक्त वावरणारा पण स्वतःला गुप्त ठेवणारा पार्टनर.
“तो विचारतो, तुला मी कशी हाक मारू ?
पार्टनर ह्याच नावाने….!!!!
आपल्याला खरं तर नावच नसतं, बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.”
असा मुक्त पार्टनर त्याला फक्त सांभाळूनच घेत नाहीये तर जगण्याचे तत्वज्ञान ही सांगतोय.
पार्टनर हे पुस्तक नसून एक सुरेखशी मैफिल आहे त्याला पार्टनर रुपी वपुंचा परीसस्पर्श झाला आहे.
हे पुस्तक वाचताना प्रत्येक पानावर आपल्याला नोबेल सेन्टेन्सेस मिळतील आणि वाचता वाचता आपल्याला नकळत आपल्या मनाचा ताबा घेतील.
पुस्तकातील अनेक वाक्य आपल्या मनावर खोलवर रेंगाळत राहतात हे मात्र नक्की.
पार्टनर कोण आहे एक अनामिक मित्र तत्वज्ञ जीवनाचे सार म्हणजे पार्टनर!
आणि ते सुंदर आणि सुवासिक शब्दात गुंफणे हे वपुंचे यश आहे.
पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ असेही पार्टनर सांगून जातो आणि प्रेम कथा पोस्ट मॅरेज संसार कथा बनते की नाही ते पुस्तक वाचल्यावर तुम्ही ठरवा.
शेवटी पार्टनर प्रेम आणि जीवन यातील समन्वय आहे विनोद, शहाणपणा, तत्वज्ञान वपुंच्या चष्म्यातून पहायचे असेल तर वपुंचं पार्टनर नक्की वाचा!!!!
समीक्षण – आदित्य लोमटे
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ
❤️पार्टनर❤️
.
दु:ख, आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण.” ????❣️
.
Partner हे न्याय्य पुस्तक नाही, तर मानवी जीवनाचा हा अभिजात स्वर आहे. हे पुस्तक आपल्याला विविध मानवी संबंधांच्या स्वरूपाबद्दल सांगते आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला पुढे करते. हे माणसाच्या जवळजवळ प्रत्येक संबंध दर्शवते. प्रत्येक अन्य पृष्ठावरील वाक्य आपल्याला अधोरेखित करायच्या आहेत. ऐसें उदात्त वाचन। प्रत्येक व्यक्ति स्वतःला एका पात्रात दिसू शकते.
पुस्तक संपवूनही बर्याच कोट्स आपल्या मनात उलगडतात.????
.
तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वौशिष्ट्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अश्या कहाणींचे वळण ते दोघेही आहे पण ते कोण्या “जोश्या’चे नसून वपुंचे आहे म्हणून ते येथे “वलय’ झाले आहे. “राजवाड्यावर म्हणाल ती अप्सरा टाळीच्या इशार्यावर नाचवण्याची ज्याची ताकद तो वेडबंबू शकुंतलेसाठी पागल व्हावा तसचे हेआहे आणि वेडबंबू येथे औषधानिमित्ताने दुकानात येणार्या अनेकांपौकी एका मुक्त वागणार्या पण स्वत:ला गुप्त ठेवणार्या पार्टनरची लाजवाब साथ मिळाली आहे म्हणूनच ही कहाणी. “शाकुंतल’ सारखी वारंवारं “आवृत्ती’त जात राहिली आहे.
तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पोरगी म्हणजे झुळूक. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही. आपल्याला हवा तेव्हा. तिसरा माणूस न जाणे. हाच नरक! लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.