लेखक – मनोहर माळगावकर
अनुवाद – पु.ल.देशपांडे
समीक्षण – अमोल पवार
पृष्ठसंख्या – ३०४
मुल्यांकन – ४.३ | ५
आपल्या देशात आरमारी सामर्थ्याचे महत्व हे प्रथम शिवाजी महाराजांनी ओळखले आणि ते बनवले सुद्धा पण शिवकाळात त्याचा फारसा उपयोग व गाजावाजा झाला नाही. बलाढ्य आरमार हेच सागरी आणि किनारी शक्तीचे साधन हा छत्रपतींचा विचार पुढे कान्होजी आंग्रे या मराठा सरदारांनी खरा करून दाखविला. कान्होजींनी मराठा आरमाराची समुद्रावर पकड इतकी मजबूत केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारिक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आतापर्यंत कोणकणाचा आणि समुद्राचा इतिहास फारसा असा विस्तारित रूपात मांडला गेला नाही.या कथेत आपल्याला त्याची पूर्ण ओळख होते .कथेचा नायक कान्होजी आंग्रेच्या पुर्व आयुष्यचा कुठेही उल्लेख व नोंद कोणी केली नाही.दुर्दैव असे की या पराक्रमी व्यक्तीच्या जीवनाचा आरंभ कोकणातील लोकथेतून होतो. त्यानुसार कान्होजीचे बालपण कोकणातील हर्णे गावाला एका जोश्याच्या घरी गेले .तिथे तुकोजी आंग्रेंनी म्हणजे त्याच्या वडिलांनी शिकण्यास पाठविले होते.पण त्याचा कुंडलीत राजयोग असल्याने जोश्याने त्याला इतर विद्यासोबत शस्त्र ही शिकवली.
असा हा नायक तरुणपणात कर्तबगारी करण्याच्या शोधात उत्सुक होता पण त्याकाळी कोंकणात आणि समुद्रावर जास्त लष्करी हालचाली होत नसत आणि शिवाजी महाराजानंतर त्याला घेरियाच्या किल्ल्यात काम मिळाले तिथेही फारसे त्याला चमकता आले नाही.कारण स्वराज्यावर औरंगजेबाने काढलेली मोहीम आणि इतर शत्रूंशी लढण्यात संभाजी राजे व्यस्त होते आणि कोकण दुर्लक्षितच राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यात माजलेला गोंधलावेळी कान्होजीने घेरियाची किल्लेदारी मिळवली आणि इथून त्याच्या आयुष्याला खरी सुरुवात झाली.
तोपर्यंत त्याने लढाईचा अनुभव घेतला होत आणि युध्दातले डावपेच,धोके,फायदे यात तो कुशल झाला होता.त्यानंतर ताराबाईंनी त्यास सरखेल ही पदवी बहाल करून आरमाराचा सेनापती बनविला म्हणजे त्याने ते पद मिळवलेच त्याच्या अधिकारखालील किल्ले आणि प्रदेश तयार बळकट केला. मोडकळीस आलेल आरमार लढाईसाठी तयार केले आणि संख्या ही वाढवली.आता समुद्रातील मोहिमेवर जाण्यास मराठी आरमार सज्ज झाले होते.समुद्रावरील इंग्रज आणि पोर्तुगीजांचे सामर्थ्य त्याने झीडकारल. आणि त्यांचे जहाजांवर हल्ले सुरू केले व समुद्रातुन आंग्रेंच्या दस्तकशिवाय प्रवास करणे अशक्य झाले.कोकणात आता मराठ्यांच्या आरमारास आंग्रेंचे आरमार व किल्ले म्हटले जाऊ लागले तरी त्यांची निष्ठा छत्रपती घराण्याशी अढळ होती ते स्वतःचा उल्लेख गादीचे एकनिष्ठ सेवक म्हणूनच करत.
कोकणची सर्व किनारपट्टी त्यांनी आपल्या ताब्यात आणली आणि समुद्रावर ही अगाध सत्ता गाजवत परकीयांच्या काळजात त्यांच्या नावानेच धडकी भरेल अशी ख्याती केली. पुढे शाहूंच्या आगमनाने राज्यात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आणि ताराबाई ही राज्यावरचा हक्क स्वतःकडे ठेवण्यावर ठाम होत्या आणि दोन राजे एकाच राज्यात असा गोंधळ माजला असताना कान्होजींचे मत हे ताराबाईच्या पक्षात होते त्यामुळे त्यांचे पारडे जड होते.पण दुसरे शिवाजींच्या मृत्यूनंतर शाहूला सोयीस्कर वातावरण निर्माण होऊन लागले असा वेळातही आंग्रेंनी पक्ष न बदलता घाटावरील किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि सरळ साताऱ्यावर मजल मारायची मोहीम आखली.हे शाहूच्या अस्तित्वालाच आव्हानं होते परंतु बाळाजी विश्वनाथाच्या मुत्सद्देगिरीने युद्ध टळले आणि आंग्रे शाहूंच्या पक्षात आले यामुळेच शाहूंना राज्याची घडी बसवता आली.
पुढील काळात तर इंग्रजानी आंग्रेंचा पूर्ण नायनाट करण्याची जणू शपतच घेतली पण एकही युद्ध त्यांना जिंकता आले नाही वरून प्रचंड नुकसान सहन करावे लागले. एकाच वेळी आंग्रेंनी पाच शत्रूंशी लढा घेतला आणि अभेद्य असी किनाऱ्याची सत्ता स्थापन केली. मराठ्यांच्या या आरमाला सर्व व्यापारी व सत्ताधीश जुमानत होते आणि समुद्र त्यांच्या अधिपत्याखाली होते.असा हा विरपुरष नेहमी साहासाच्या शोधात असणारा युद्धच ज्याचे जीवन असणारा नंतरच्या काळात शांततेच्या तत्वावर जीवन जगू लागला सर्व शत्रूंशी सामंजस्य करून रयतेचे हित साधू पाहू लागला आणि यशस्वी ही झाला.
या पुस्तकातून आपल्याला शिवाजी महारजानंतरचा महाराष्ट्र व आरमार याचा अभ्यास होतो. आपण आतापर्यंत जे काल्पनिक समुद्री लुटारुंची(पायरेट)गोष्ट पहिली व वाचली आहे त्याची खरी अनुभूती येते.मराठे फक्त जमिनिपुरता मर्यादित नसून देशाचे पहिले समुद्रावर सत्ता गाजवणारे व लढणारे योद्धे ठरले. त्याकाळचा राज्यातील गोंधळाच्या स्थितीचा आणि राजकीय परिस्थितिचा ही अभ्यास नक्की होतो. मराठी साहित्यात इंग्रज आणि पोर्तुगीज याचा इंतिहास या पुस्तकाइतका इतर कुठेही मिळणार नाही.मुंबईचाही उगमपसूनचा इतिहास इथे वाचायला मिळतो .इंग्रजाचे व्यापरापासून ते सत्ता करेपर्यंतचे प्रयत्न दिसतात.पण युद्धात ते हास्यासपद ठरले .पोर्तुगीज जे स्वतःला समुद्राचे एकमेव राजे समजायचे त्यांना सुद्धा मराठ्यांनी आपले अधिपत्य पत्करायला लावले. हे पुस्तक मूलतः मनोहर माळगावकारांनी इंग्रजीमध्ये लिहिले त्याचा अनुवाद पु. ल. देशपांडेंनी मराठीत केला.
समीक्षण – अमोल पवार
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: