लेखक – नामदेवराव जाधव
समीक्षण – गणेश कदम
प्रकाशक – राजमाता प्रकाशन
पृष्ठ संख्या – १९८
मूल्यांकन – ४। ५
हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहिती देतं . एक यशस्वी नेता ,उद्योजक किंवा व्यवस्थापक म्हणून तुमचं आयुष्य घडविण्यासाठी हे पुस्तक कसं मार्गदर्शक आहे हे तुम्हाला पाहिल्याक्षणीच लक्षात येईल
आपल्या रोजच्या जीवनात लागणारे व्यवस्थापन हे शिवाजी महाराजांनी १६ व्या शतकापासून कसे अंमलात आणले होते ,त्यांची बांधणी कशी होती, कोणती आव्हाने समोर उभी असताना त्यातून योग्य नियोजनमुळे कसा मार्ग काढता येतो या सर्वांची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते . काळ बदलला तशा गोष्टी अजून सुधारत गेल्या साहजिकच त्याचं व्यवस्थापन करणं जास्त सोयीचं वाटू लागल त्यातूनच “व्यवस्थापन” हा स्वतंत्र विषय उदयाला आला आणि त्याची व्याप्ती एवढी वाढली आहे कि आता त्याशिवाय कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही . शिवाजी महाराजांनी आपल्या राजकीय,सामाजिक, वैयक्तिक जीवनात व्यवस्थापनाचे महत्व ओळखून कार्य केले. त्यांनी १६ व्या शतकात अंमलात आणलेलं व्यवस्थापन आजच्या, २१ व्या शतकातही लागू होते. प्रत्येक कामाचे नियोजन केल्यानेच कोणतेही काम योग्य पद्धतीने होते . याचा उपयोग आपल्या जीवनातील आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी खूपच महत्वाचा आहे . शिस्त, चिकाटी, नेतृत्व, कलात्मकता या सर्व बाबी आपल्या अंगी येतात. शिवाजी महाराज यांचे वेगळेपण का आहे हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येते. त्यांनी केलेलं नियम, धोरण, व्यवस्था याचे महत्व आपल्याला समजते. तीच मूल्ये आपण जरी आपल्या जीवनात आचरणात आणली तरी आपलं आयुष्य खूप सुखकर बनु शकते, त्याचप्रमाणे आपली प्रगती होऊ शकते. आपल्या कलागुणांना वाव मिळू शकतो आणि जे काम आपण करू त्या कामातील सुसूत्रता हि आपल्या वरिष्ठ मंडळींना नक्की जाणवेल व आपण कौतुकास पात्र होऊ. आयुष्यात प्रत्येकाला निर्णय घ्यावाच लागतो तेव्हा अचूक निर्णय कसा घ्यावा हे तुम्हाला शिकायला मिळेल
व्यवस्थापन काय असते, कसे असते, त्याचे फायदे काय हे सर्व आपल्याला या पुस्तकातून शिकता येते. नामदेवरावांनी अगदी सोप्या आणि सहजतेनं आपल्या पुस्तकातून हे समजावून सांगितले आहे . शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांचे नियोजन, कार्यपद्धती, व्यवहार यांचे अचूक मार्गदर्शन आपल्याला या पुस्तकात वाचयला मिळते. महाराजांनी सर्वच बाबतीत आपले नियोजन कसे आहे याचे पुरावे देखील दिले आहेत ,फक्त व्यवहारात नव्हे तर युद्धात देखील याचा कसा उपयोग करता येतो याच विश्लेषण या पुस्तकात करण्यात आलं आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने हे पुस्तक वाचलेच पाहिजे व त्याचे आचरण करून आपले जीवन समृद्ध केले पाहिजे
व्यवस्थापन हे संचालनात्मक कार्य असून त्याचा संदर्भ निर्धारित उद्देशांची पूर्तता करण्यासाठी असतो..
आयुष्याचे ध्येय दाखविणारे ध्येयाकडे जाणारे मार्ग दाखवणारे ध्येयाकडे जाणारे मार्ग दाखवणारे ध्येयाकडे जाणार्या मार्गातील सर्व अडथळे दुर करणारे Mission, Vision, Ambition तिन्हींचा एकाच वेळी वेध घेणारे हे पुस्तक जरुर वाचा ..
समीक्षण – गणेश कदम
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ