vavtal marathi book review cover

वावटळ

पोस्ट शेयर करा:

पृष्ठसंख्या – ९६

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस

मुल्यांकन – ३.६ | ५

एक वादळ.. अनेक घरं! एवढंच… हो तस पाहिलं तर येवढंच. ३० जानेवारी, १९४८ ला गांधीजींच्या मृत्यूनंतर त्याचे महाराष्ट्रात पडलेले पडसाद. त्यांच्या हत्ये मागील नथुराम गोडसे हे ब्राह्मण असल्याने. संपुर्ण महाराष्ट्रात ब्राम्हण विरोधी वादळ उठलं. त्यात अनेक घरं जाळली गेली, अनेक गावं उजाड झाली. त्यातच अडकलेल्या एका नायकाची ही कहाणी.

पुस्तकं अगदीच लहान आहे. त्यात मुद्दाही एकच आहे. मग यात वाचावं काय असा प्रश्न मला पडला होता. पण माडगूळकरांनी जे वर्णन केले आहे.. त्याने अनेक पैलू समजतात. अनेक गोष्टी समोर येतात. पुस्तकात कोणतीही बाजू बरी वाईट यावर चर्चा झालीच नाहीये. त्यात फक्त आहे वस्तुस्थिती.  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.. पण दोन्ही बाजूंनी अलिप्त असुनही काही लोक यात होरपळले गेले त्यांच्यावरच हे एक भाष्य आहे.

व्यंकटेश माडगूळकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर निसर्ग उभा राहतो. त्याच चित्र उभा राहत. अनेक बारकावे समजतात. अनुभवाचं शहाणपण शब्दांनी लिहून, एकाधा विषय मांडला जातो. ग्रामीण भागातील अनेक बारकावे पुस्तकात छान टिपले आहेत.

पुस्तक अगदीच लहान आहे आणि आवडी निवडीची एक बारीक रेघ मधे आहे. जर तुम्हाला सत्य घटनेपर काही वाचायला आवडत असेल.. तर नक्कीच वाचू शकता. भाषा आणि लिखाण छान आहे. परंतू घटनेची मर्यादा लेखणीला बांधून ठेवते.

vyanktesh madgulkar vavtal mehta akshay gudhate

लेखक – व्यंकटेश माडगूळकर


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/7130/vavtal—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *