लेखक – अर्ल स्टॅनले गार्डनर
अनुवाद – आनंद केतकर
पृष्ठसंख्या – २३०
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस
मुल्यांकन – ४.१ | ५
धनाढ्य उद्योजक हार्टली बॅसेट यांचा मृतदेह… टाईपरायटरवर आत्महत्या केल्याची चिट्ठी… मृतादेहाजाव्ल पडलेल्या तीन रिव्होल्व्हर… आणि त्यांच्या हातात असलेला एक काचेचा डोळा!
हे दृश्य पाहिल्यावर, सगळं उघड असूनही पेरी मेसनला काही संशयास्पद असल्याच शंका वाटते. कारण त्याला ठाऊक असते की, बॅसेटब यांच्या आयुष्यात अनेक गोष्टींची गुंतागुंत आहे. त्यांच्या पत्नीला त्यांना सोडून जायचे असते, त्यांचं सावत्र मुलगा त्यांचं तिरस्कार करत असतो, तर त्यांच्याकडेच काम करणाऱ्या एकाने त्यांच्य पैशांची अफरातफर केलेली असते, आणि आता तो पैसे चुकते करण्यास असमर्थ असतो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे काचेचा डोळा लावणाऱ्या एका माणसाने त्याचा हरवलेल डोळा वापरून त्याला कोणी एखाद्या प्रकरणात गुंतवले तर? या भीतीने आधीच मेसनला वकील म्हणून नेमलेले असते.
अर्ल स्टॅनले गार्डनर हे एक अमेरिकन वकील आणि लेखक आहेत. ते त्यांनी लिहिलेल्या गुप्तहेर मालिकेच्या कथांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यापैकी एक ‘पेरी मेसन’ या गुप्तहेर मालिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पण त्यांनी इतर मोजकेच कादंबऱ्या आणि काही लघु कथा लिहिल्या.
हे पुस्तक वाचण्या आधी मला अर्ल स्टॅनले गार्डनर या लेखकाविषयी यत्किंचितही माहिती नव्हती अथवा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दलही काहीही माहिती नव्हती. वाचनालयामध्ये या पुस्तकाची मला एक मराठी आवृत्ती हाती लागली आणि एक अनमोल वस्तू हाती लागली असे म्हणायला हरकत नाही.
हे पुस्तक वाचण्याआधी मी बराच काळ वाचनापासून वंचित होतो आणि वाचनाची आवड जवळजवळ सुटणारच होती तोपर्यंत हे पुस्तक हाती लागल्यामुळे वाचनाची आवड अधिक वाढली असे म्हणायला हरकत नाही. लेखकाने कथेमध्ये वापरलेली भाषा वाचायला अत्यंत सोपी व साधी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वाचकाला कथा वाचताना जागृत आणि एकाग्र ठेवण्याचे सामर्थ्य या कथेमध्ये आहे. ही कथा वाचताना वाचक पुस्तकाला अगदी शेवटपर्यंत चिकटून राहतो. जर अधे-मधे वाचकाने जर पुस्तक बाजूल ठेवले तर वाचकाच्या मनात सतत विचार चालू राहणार कि पुढे काय हणार? त्याने कोणते पूल उचलले पाहिजे? त्याचा तर्क योग्य ठरेल का? नक्की गुन्हेगार तोच असेल का? असे विविध प्रकारचे विचार वाचकाला पुस्तकाशी जोडून ठेवतील आणि जे वाचताना कुतूहल असते ते वाचकाच्या मनात कायम राहतील. केव्हातरी वाचकाने लावलेले कथेबद्दलचे तर्क योग्य ठरतील तर काही वेळा असे काही कथेमध्ये घडून जाईल कि वाचक त्याची कल्पनाही करू शकणार नाही. त्याचबरोबर अनेक गुन्हेगारी, तपासा संबंधी महत्वाच्या गोष्टी या पुस्तकातून मिळतील.
वेगवेगळ्या घटना, अनेक संशयित, अनेक शक्यता…
मेसन त्याची सेक्रेटरी डेला आणि गुप्तहेर पॉल यांच्या सहाय्याने या गुंतागुंतीच्या कोड्याची अशीकाही उकल करतो की, श्वास रोखला जातो, मती गुंग होते आणि शेवटी थक्क व्हायला होतं!
समीक्षण – वरुण कमलाकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: