inside-marathi-books-fast-cheap-and-viral-marathi-book-review-cover

फास्ट चीप & व्हायरल

पोस्ट शेयर करा:

लेखक – आशिष चोप्रा 

अनुवाद – रोहिणी पेठे 

प्रकाशन – साकेत प्रकाशन 

पृष्ठसंख्या – २२४

मूल्यांकन – ४.१ । ५

फास्ट चीप & व्हायरल हे पुस्तक अत्यल्प खर्चात आणि कमीत कमी वेळेत व्हिडिओ कसे बनवायचे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचवायचे याविषयावर आधारित आहेत. लेखक आशिष चोप्रा हे “व्हायरल कन्टेन्ट” आणि त्याद्वारे “ब्रँड मार्केटिंग” यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी काम करत असलेल्या इक्सिगो या कंपनी साठी अनेक व्हायरल व्हिडिओ बनवलेले आहेत. पुस्तकात त्यांनी स्वतःचा “व्हायरल कन्टेन्ट” बनवण्याचा अनुभव आणि त्यामागील विचारसरणी सांगितली आहे. कन्टेन्ट ने व्यापून गेलेल्या आजच्या जगात तुम्ही बनविलेला कन्टेन्ट व्हायरल कसा होईल? “व्हायरल” होणे म्हणजे नक्की काय? व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? जाहिरात न विकता जाहिरात करता येणे शक्य आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील.  

आशिष चोप्रा यांनी वारंवार “व्हायरल व्हिडिओ” बनवून सिद्ध केलं आहे कि जर विचारपूर्वक पद्धतीने व्हिडिओ बनवून आणि योग्य वितरण पद्धत निवडून एखादा ब्रँड लोकांपर्यंत पोचवता येतो. “व्हायरल व्हिडिओ” बनविण्याच्या मागील नऊ गुपिते तुम्हाला या पुस्तकातून कळतील आणि हि गुपिते खरंच काम करतात! (इनसाईड मराठी बुक्स  च्या टीम ने पुस्तकातील गुपितांनुसार १५ सेकंदचा एक व्हिडिओ बनवला ज्याला सोशल मीडियावर १२ तासांत ३० हुन अधिक शेअर मिळाले). 

मी स्वतः तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्याने मी नेहमी “कन्टेन्ट” लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तांत्रिक गोष्टींचाच विचार करायचो पण “फास्ट चीप & व्हायरल” या पुस्तकामुळे मला “कन्टेन्ट” मागील मानशास्त्र देखील तितकेच महत्वाचे असते हे समजले. ग्राहकांना जाहिरात न दाखवता त्यांच्यापर्यंत ब्रँड पोचवण्याची पद्धत भारतात लोकप्रिय करण्यामागे आशिष चोप्रा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी पुस्तकात मांडलेली गुपिते समजायला सोपी आहेत. विषयांची सुटसुटीत मांडणी, प्रकरणातील महत्वाच्या लक्षवेधक टिपण्ण्या आणि बोजड शब्दांचा टाळलेला भडीमार हि पुस्तकांची जमेची बाजू आहे. 

अंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल फास्ट चीप & व्हायरल हे पुस्तक मार्केटिंग तज्ज्ञांना देखील पुनर्विचार करायला भाग पडेल इतकं प्रभावी आहे. पुस्तकात अद्ययावत अँप्स, प्लॅटफॉर्मकरीता आणि नवनवीन व्हिडिओ फॉरमॅट बद्दल लेखकाची मत देखील दिली आहेत. पुस्तक वाचून तुम्ही देखील “व्हायरल कन्टेन्ट” बनवू शकता यावर तुमचा विश्वास बसेल. पुस्तकाचा मराठी अनुवाद रोहिणी पेठे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केलाय. एकूणच हे पुस्तक कन्टेन्ट क्रिएटर, व्हलॉगर, ब्लॉगर, मार्केटिंग, वितरण, जाहिरात, लेखन   क्षेत्रातील लोकांसाठी आणि जवळ जवळ सर्वच सर्जनशील लोकांसाठी आहे.  

fast cheap and viral ashish chopra rohini pethe akash jadhav saket


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/14544/fast-cheap-and-viral—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *